आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदारांसह स्थानिकांच्या सूचनांंना पोलिसांच्या वाटाण्याच्या अक्षता; वाहनचालकांसह स्थानिक नागरिकांची निदर्शने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- इंदिरानगर येथील बोगदा इंदिरानगरकडून येणाऱ्यांसाठी एकेरी करण्याच्या आमदारांच्या सूचनेनंतरही हा बोगदा बंदच राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आल्याने स्थानिकांचा संताप वाढला आहे. हा बोगदा सुरू करण्यासाठी मंगळवारी स्थानिक नागरिकांसह वाहनधारकांनी येथे निदर्शने केली, तसेच बुधवारी (दि. १५) ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने हा वाद अाणखी चिघळण्याची चिन्हे आहेत.

महामार्ग परिसरातील स्थानिक रहिवाशांच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला इंदिरानगर येथील बोगदा रस्ते प्राधिकरण विभाग आणि पोलिसांनी सोमवारी बंद केल्यानंतर स्थानिकांत संताप व्यक्त होत आहे. अचानक झालेल्या या निर्णयाने वेळेसह इंधनाचे गणित बिघडल्याच्या स्थानिकांच्या तक्रारींनंतर सोमवारी सायंकाळी आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी इंदिरानगरकडून येणाऱ्या वाहनांसाठी एकेरी मार्गाचा पर्याय असल्याचे सांगितले होते. सिंहस्थ ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर बोगदा खुला करण्यात येणार असल्याचे प्रा. फरांदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यानुसार मंगळवारी दुपारपर्यंत बोगदा खुला होणे अपेक्षित होते. मात्र, तो बंदच ठेवण्यात आल्याने वाहनचालकांसह स्थानिक रहिवाशांनी निदर्शनांद्वारे संताप व्यक्त केला. पोलिस प्रशासनाकडून कुंभमेळ्याच्या नावाखाली नागरिकांसह वाहनचालकांची गळचेपी होत असल्याचा आरोप होत आहे. मंगळवारी सकाळी संजय गायकर, चंदू चव्हाण, हर्षद गोखले, दिनेश जोशी, सचिन चव्हाण, विजय शेलार, शेखर निरकर, किरण जाधव, महेंद्र पगार, सचिन शेजवळ, हरिदास ताथेड, लक्ष्मीकांत पारनेरकर, संजय चव्हाण यांच्यासह वाहनचालकांनी पोलिस प्रशासनाविरोधात आंदोलन केले.

नियोजनापूर्वीचनापास : वाहतूकविभागाने हा बोगदा बंद करून दोन्ही बाजूंनी एकेरी वाहतूक सुरू केली. मात्र, दोन्ही मार्गांवर‘प्रवेश बंद’चे फलकदेखील लावलेले नाहीत. पोलिसांच्या डोळ्यासमोर एकेरी मार्गातून वाहने जात आहेत. त्यामुळे बोगदा बंद केला. पण, इतर नियोजनात पोलिस नापास झाल्याचेच दिसून येत आहे.
पादचाऱ्यांचीहीगैरसोय : बोगदाबंद केल्याने दोन्ही बाजूंना बॅरिकेडिंग लावण्यात आले आहे. दोन्ही मार्गांवर भरधाव वाहतूक टाळत अरुंद जागेतून पादचाऱ्यांना ये-जा करावी लागत असल्याने पादचाऱ्यांसाठीदेखील बोगदा बंद करण्याचा निर्णय गैरसोयीचा ठरत आहे.
रिक्षाचालकांकडूनलूट : मुंबईनाक्याकडून गोविंदनगर अथवा भुजबळ फार्मकडे येण्यासाठी रिक्षाचालकांकडून किमान ५० रुपये आकारले जात अाहेत. बोगदा बंद केल्याने विद्यार्थ्यांनाही झळ बसत आहे. शालेय वाहतूक करणाऱ्यांसह दुचाकीहून मुलांना घेऊन जाणाऱ्या पालकांना वेळेची कसरत करावी लागत आहे.
भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने काही चालकांनी लेखानगर येथील पुलाखालून शॉर्टकट तयार केला. मात्र, हा रस्ता जीवघेणा ठरतो आहे.
इंदिरानगर जॉगिंग ट्रॅककडून येणाऱ्यांना दोन किलोमीटर अंतर आणि वाहतूक कोंडीमुळे किमान पंधरा ते वीस मिनिटांचा वेळ लागत असल्याने इंदिरानगरकडून येणाऱ्या वाहनांसाठी बोगद्यातून एकेरी वाहतूक सुरू केल्यास स्थानिकांसह वाहनचालकांचा वेळ आणि इंधन बचत होऊ शकेल.

इंदिरानगर येथील वाहतुकीसाठी बंद केलेला बाेगदा अाश्वासन देऊनही एकेरी वाहतुकीसाठी खुला केल्याने मंगळवारी सकाळी येथील रहिवासी वाहनचालकांनी अांदाेलन केले. या प्रसंगी मध्यस्थी करत इंदिरानगर पोलिसांनी या समस्येवर मार्ग काढण्याचे अाश्वासन िदले. वाहनचालकांना येथून जाताना चार किलाेमीटरचा फेरा पडत असल्याने याबाबत संताप वाढत चालला अाहे.
गाेविंदनगर बाेगदा ते प्रकाश पेट्राेलपंप ते लेखानगर यू टर्न ते पुन्हा गाेविंदनगर बाेगदा असा कि.मी.चा फेरा. मीटर रीडिंग ५४६१
गाेविंदनगर बाेगदा ते प्रकाश पेट्राेलपंप येथून यू टर्न ते इंिदरानगर बाेगदा कि.मी. अंतर. मीटर रीडिंग ५४६०
गाेविंदनगर येथे वाहन सुरू केले तेव्हा दुचाकीचे मीटर रीडिंग ५४५८हेहाेते.

सिग्नल बसविणे हाच एकमेव पर्याय
प्रकाशपेट्रोल येथील तसेच लेखानगर या वळण रस्त्याला हाेत असलेला विराेध साहजिकच अाहे. सध्याच्या उपायाएेवजी इंदिरानगर येथे बाेगदा असलेल्या ठिकाणी िसग्नल बसवून वाहतूक िनयंत्रित करणे, हाच एकमेव पर्याय साेयीचा अाहे. सिग्नल यंत्रणा उभारल्यास वाहतूक सुरळीत होईल. नीलेशचव्हाण, अध्यक्ष, इंडियन इन्स्टिट्यूट अाॅफ अार्किटेक्ट्स

एकेरी मार्ग सुरू करण्याबाबत चार-पाच दिवसांत निर्णय
बोगदाप्रवेशावर येत्या चार-पाच दिवसांत निर्णय घेण्यात येणार आहे. रस्ते प्राधिकरण विभागाने सुरक्षेच्या दृष्टीने निर्णय घेतला आहे. स्थानिकांचा विचार केला जाईल. तूर्त बोगदा बंदच राहील. पंकजडहाणे, पोलिस उपायुक्त, वाहतूक विभाग

पाेलिस अायुक्तांशी चर्चा, दाेन िदवसांत सकारात्मक निर्णय
परिसरातीलनागरिकांच्या भावना लक्षात घेऊन त्यांना विश्वासात घेण्यात येईल. बोगदा पुन्हा सुरू करण्यासाठी पोलिस आयुक्तांशी चर्चा झाली अाहे. त्यात दोन दिवसांत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. प्रा.देवयानी फरांदे, आमदार

अांदाेलनाची पाेलिसांकडून दखल नाही
स्थानिकांनीमंगळवारी बोगद्याजवळ निदर्शने केली. मात्र, पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. बोगदा बंद करतानादेखील स्थानिकांना विचारात घेतले नसल्याने बुधवारी (दि. १५) येथे रस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दाेन किमीचा फेरा
हारस्ता वाहतुकीसाठी खुला करावा. या ठिकाणी वाहतूक पोलिस वाढवून वाहतुकीचे नियोजन करावे. दोन किलोमीटर फिरून जाणे म्हणजे त्रासदायक ठरते आहे. नागरिकांचा विचार करावा. डॉ.एम. बी. पवार, नागरिक
वेळेचा अपव्यय हाेताेय
वाहतुकीसाठीबंद रस्ता म्हणजे इंदिरानगर गोविंदनगर भागाकडे जाणाऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरतेय. अनेकांना कुठे कसे वळावे हेच लक्षात येत नाही. वेळेचा पैशाचा अपव्यय होतोय. लक्ष्मीकांतपारनेरकर, नागरिक
प्रशासनाचे नियोजन चुकीचे
प्रशासनाचेनियोजन चुकीचे असल्याचे दिसून येते आहे. या ठिकाणी नियोजन केल्यास वाहतूक कोंडी अपघात घडणार नाहीत, मात्र, रस्ता बंद करून आपलीच डोकेदुखी वाढवून घेत आहे. अर्जुनचौधरी, नागरिक
एकेरी मार्ग खुला करा
आम्हीहा रस्ता सुरू करावा, यासाठी सर्व एकत्र आलो होतो. मात्र, पोलिसांनी यावर मार्ग काढणार असल्याचे आश्वासन दिले आहे. हा रस्ता एकेरी का होईना पण वाहतुकीसाठी सुरू करावा. संजयगायकर, सामजिक कार्यकर्ते.
पालकमंत्र्यांचे लक्ष वेधणार
इंदिरानगरपरिसरातील बोगदा तातडीने सुरू करण्यासाठी परिसरातील रहिवाशांसह आयुक्तांची भेट घेण्यात येणार आहे. यासंबंधी लवकरच पालकमंत्री गिरीश महाजन यांनाही निवेदन देण्यात येणार आहे. बोगदा सुरू झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल. अजिंक्यसाने, भाजयुमो
सिडकोकडे जाताना वेळेचा मोठा अपव्यय
गंगापूररोडकडूनयेथे येण्यासाठी दहा मिनिटे लागतात. मात्र, येथून सिडकोकडे जाण्यासाठी किमान २० मिनिटांचा वेळ लागतो. त्यामुळे वेळेचा अपव्यय होतआहे. - सोनाली कापसे, स्थानिक रहिवासी