आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Requirement Issue At Nashik, Divya Marathi

पोलिस भरती अर्जप्रक्रिया, गृह विभागाचे संकेतस्थळ पहिल्याच दिवशी ठप्प

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- पोलिस आयुक्तालयातील नवीन मंजूर झालेल्या आणि रिक्त अशा एकूण 423 पदांसाठी राबविण्यात येत असलेल्या शिपाईपदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत सोमवारी (दि. 5) पहिल्याच दिवशी संकेतस्थळावर तांत्रिक अडचणी आल्याने अर्जप्रक्रिया ठप्प झाली. राज्यभरात एकाच वेळी ही प्रक्रिया सुरू झाल्याने सर्व्हर वारंवार आॅफलाइन होत असल्याचे पोलिस अधिकारी आणि सायबर कॅफेचालकांनी सांगितले.
राज्यभरातील सुमारे 14 हजार पोलिस शिपाईपदांसाठी सोमवारपासून आॅनलाइन पद्धतीने अर्जाद्वारे भरतीप्रक्रिया सुरू करण्यात आली. यामध्ये पोलिस आयुक्तालयातील 423 व ग्रामीण दलातील 350 अशी पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून शासनाच्या गृह विभागाच्या संकेतस्थळावर 25 मेपर्यंत आॅनलाइन अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. यासाठी महा ई सेवा केंद्र अथवा खासगी सायबर कॅफे येथून हा अर्ज भरता येणार आहे. दरम्यान, सोमवारी पहिल्याच दिवशी शहरातील बहुतांश महा ई सेवा केंदे्र व सायबर कॅफेंवर सकाळपासूनच उमेदवारांनी गर्दी केली असता तिथे हा अर्जच भरला जात नव्हता. संकेतस्थळावर अर्ज भरण्यात येत असल्याने अडचणी निर्माण होत होत्या. महा ई सेवा केंद्रचालकांकडून दोन दिवसांत ही प्रक्रिया सुरळीत होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला.