आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सप्तशृंगगडाची सुरक्षा देवीच्या भरवशावर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळवण - सप्तशृंगगडावर पोलिसांची संख्या आहे, त्यात येथील पोलिस चौकी नेहमी बंद असते त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबत गडावर दर्शनासाठी येणा-या भाविकांनी व नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
सप्तशृंगगडावरची पोलिस चौकी यात्रा कालावधी सोडला तर नेहमी बंद असते. तसेच गडावर दररोजच भक्तांची रीघ लागते. मुंबई, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान येथून मोठ्या प्रमाणात भाविक रोज येत असतात. चैत्र, नवरात्र उत्सव, पौर्णिमा, विविध सण व सुटीच्या कालावधीत भाविकांची दर्शनाकरिता प्रचंड गर्दी असते. त्यावेळी ठरावीक काळात पोलिस बंदोबस्त असतो.त्यामुळे हा बंदोबस्त कायम असाव, अशी मागणी भाविकांनी केली आहे.
गडावर भुरट्या चो-या, पाकीटमारी होत असतेच या सर्व प्रकारमुळे येणारे भाविक त्रस्त झाले आहेत. काही झाल्यास पोलिसांची मदत घ्यावी तर कशी हा यक्ष प्रश्न भाविकांना पडला आहे. त्यातच या ठिकाणी असलेले पोलिस हे नांदुरी येथे चेक नाक्यावर जास्त काळ राहत असतात व गडावर होणा-या भाविकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असतात असे नागरिकांचे व भाविकांचे म्हणणे आहे.
देशभरातील अतिरेकी कारवायांचा धोका लक्षात घेऊन देवस्थाने व गर्दीची ठिकाणे अतिरेक्यांचे लक्ष्य असताना महत्त्वाच्या देवस्थानावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे. सप्तशृंगगड हे असेच महत्त्वपूर्ण ठिकाण आहे तसेच हे ठिकाण पर्यटन केंद्र म्हणून उदयास येत आहे. अशा वेळी इथली सुरक्षा रामभरोसे असल्यावर काही अनुचित प्रकार घडला तर यास जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे.
यात्रा काळात असा असतो बंदोबस्त
उपअधीक्षक 1
पोलिस निरीक्षक 4
उपनिरीक्षक 8
हवालदार 10
होमगार्ड, शिपाई 20
इतर पोलिस स्टेशनचे 40 ते 60
स्थानिक 20