आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Special Planning,latest News In Divya Marathi

बंगल्यांनाही मिळणार दिवाळीत संरक्षण घरफोड्या रोखण्यासाठी पोलिसांचे विशेष नियोजन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- दिवाळीच्या सुटीत सणाचा आनंद घेण्यासाठी बहुतांश कुटुंब बाहेरगावी जात असल्याने, या काळात घरफोड्यांच्या प्रमाणातही वाढ होते. याप्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी विशेष नियोजन केले आहे. दरम्यान, मागणी केल्यास स्वतंत्र बंगल्यांनादेखील संरक्षण देणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

आठ दिवसांवर आलेल्या दिवाळीनिमित्त खरेदीची लगबग सुरू झाली आहे. सुटीमध्ये बहुतांश कुटुंबीयांनी बाहेर जाण्यासाठीचे नियोजन केले आहे. त्यातच यंदा सुटीनिमित्त बाहेर जाणा-यांची संख्याही वाढणार आहे. घरात कुणी नसल्याचा फायदा चोरटे घेतात याचा प्रत्यय पोलिसांना दरवर्षी येतो. त्यामुळे घरफोडीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांकडून यंदा विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्या अंतर्गत गुन्ह्यांना रोखण्यासाठी पोलिसांकडून विशेष गस्त पथक नियुक्त करण्यात आले आहे. स्वतंत्र बंगले, निर्जन ठिकाणची घरे येथेही गस्त घातली जाणार आहे. बाहेरगावी जाण्यापूर्वी घरमालकांनी माहिती दिल्यास पोलिस रात्रीतून दोन वेळा गस्त करणार आहे. घरमालकांनी घडणारे गुन्हे रोखण्यासाठी पोलिस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
घरफोड्या रोखण्यासाठी पोलिसांचे विशेष नियोजन
दिवाळीच्या सुटीत सणाचा आनंद घेण्यासाठी बहुतांश कुटुंब बाहेरगावी जात असल्याने, या काळात घरफोड्यांच्या प्रमाणातही वाढ होते. याप्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी विशेष नियोजन केले आहे. दरम्यान, मागणी केल्यास स्वतंत्र बंगल्यांनादेखील संरक्षण देणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आठ दिवसांवर आलेल्या दिवाळीनिमित्त खरेदीची लगबग सुरू झाली आहे. सुटीमध्ये बहुतांश कुटुंबीयांनी बाहेर जाण्यासाठीचे नियोजन केले आहे. त्यातच यंदा सुटीनिमित्त बाहेर जाणाऱ्यांची संख्याही वाढणार आहे. घरात कुणी नसल्याचा फायदा चोरटे घेतात याचा प्रत्यय पोलिसांना दरवर्षी येतो. त्यामुळे घरफोडीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांकडून यंदा विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्या अंतर्गत गुन्ह्यांना रोखण्यासाठी पोलिसांकडून विशेष गस्त पथक नियुक्त करण्यात आले आहे. स्वतंत्र बंगले, निर्जन ठिकाणची घरे येथेही गस्त घातली जाणार आहे. बाहेरगावी जाण्यापूर्वी घरमालकांनी माहिती दिल्यास पोलिस रात्रीतून दोन वेळा गस्त करणार आहे. घरमालकांनी घडणारे गुन्हे रोखण्यासाठी पोलिस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.