आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाेलिस उपनिरीक्षकाला मारहाण, संशयितास अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातपूर- पपयानर्सरीजवळ बुधवारी ( दि. २९) दुपारी नाकाबंदी करणाऱ्या पाेलिस उपनिरीक्षकास शिवीगाळ मारहाण केल्याचा प्रकार घडला. संशयित अाराेपीस त्वरित अटक करण्यात अाली. पाेलिस उपनिरीक्षक अार. एस. धायगुडे अापल्या पथकासह नाकाबंदी करून वाहन तपासणी करीत असताना दुचाकीवरून जाणाऱ्या ितघांना थांबवण्याचा त्यांनी प्रयत्न केला असता ते पळून गेले. काही अंतरावर त्यांना थांबवून कागदपत्रांची मागणी केली असता चालक किशाेर काशीद यांनी शिवीगाळ मारहाण केली. पाेलिसांनी त्याला अटक करून गुन्हा दाखल केला. इतर दाेघांवर दंडात्मक कारवाई करून त्यांना साेडून देण्यात अाले. संशयित अाराेपीची दुचाकी जमा केली अाहे. इंदिरानगर पाेलिस ठाण्याच्या हद्दीतही दाेन दिवसांपूर्वी असाच प्रकार घडला हाेता.