आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आनंदवल्लीतील हॉटेल्सवर कारवाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- आनंदवल्ली येथे टवाळखोरांच्या सशस्त्र हल्ल्यात दुहेरी हत्याकांड घडल्याच्या पार्श्वभूमीवर रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार्‍या गंगापूररोड, आनंदवल्ली भागातील हॉटेल्स, बार, रेस्टॉरंटवर विलंबाने का होईना कारवाईस पोलिसांना मुहूर्त सापडला.

शनिवारी रात्री गंगापूर पोलिसांनी दोन हॉटेलचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करीत 40 हजार रुपयांचे साहित्य जप्त केले. हॉटेल विकीसागर परिसरातून विलास आहेर यास पोलिसांनी ताब्यात घेतले. या हॉटेलमधून सिलिंडर, विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. हॉटेल केशव गार्डनचे चालक प्रदीप सखाराम पवार यास ताब्यात घेतले व हॉटेलमधील विनापरवाना मद्याच्या बाटल्या आणि सिलिंडर जमा करण्यात आले. या दोघांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. दरम्यान, हॉटेल्स रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असतानाही त्याकडे दुर्लक्ष केल्यानेच गुन्हेगारीच्या घटना घडत असल्याचाही आरोप नागरिकांकडून केला जात आहे.