आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Police Think About General People In Next Parvani

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिस प्रशासन करणार येत्या पर्वणीला भाविकांचा विचार...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सिंहस्थदुसऱ्या पर्वणीसाठी लाखो भाविक येण्याचा अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला असून, पहिल्या पर्वणीच्या काळात भाविकांची झालेली अडवणूक लक्षात घेता प्रशासनावर टीकेची झोड उठली होती. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने आता भाविकांचा विचार केला आहे. पर्वणी काळात भाविकांना सोयीचे ठरावे यासाठी पोलिसांच्या अधिसूचनेत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांना आता सहज गंगाघाटासह इतर घाटांपर्यंत पोहोचता येणार आहे.

भाविकांच्या सोयीसाठी बाह्य पार्किंग व्यवस्था, अंतर्गत बसस्थानकावरुन गंगाघाट इतर घाटांवर जाण्यासाठी तसेच परतीचे मार्ग, प्रशासकीय मार्ग शाही मिरवणूक मार्ग निश्चित केले आहेत.
मुंबईकडून येणारे भाविक : राजूरबहुला, विल्होळी जैन मंदिर बाह्य पार्किंगच्या ठिकाणी उतरतील. तेथून एसटीने महामार्ग बसस्थानक अंतर्गत पार्किंगच्या ठिकाणी येतील.

नाशिकरोड येथून रेल्वेने येणारे भाविक
प्लॅटफार्मयेथून येणारे भाविक एसटीने त्रिकोणी गार्डन काठे गल्ली येथे येतील. तेथून पायी जयशंकर चौफुली तिगरानियाच्या भिंतीजवळून लक्ष्मीनारायण घाटावर स्नान करतील.
परतीचामार्ग : स्नानानंतरहाजी मिठाईसमोरून मारुती वेफर्स चौकाकडे येऊन जयशंकर नगर चौफुली ने त्रिकोणी गार्डन, काठे गल्ली येतील.

लक्ष्मीनारायण घाटावर गर्दी होईल अथवा अापत्कालीन स्थितीत खालील मार्गाचा वापर करावा
एसटीसने शिवाजी पुतळा बिटको चौक उजवीकडे वळून जेलरोडने सैलानीबाबा चौक येथे येतील तेथून पुढे पायी संत जर्नादन स्वामी पूल दसक घाट जातील.
पुण्याकडून येणारे भाविक
चिंचाेलीशिवारातील बाह्यपार्किंगपर्यंत येतील. तेथून सिटी बसने महामार्ग बसस्थनकाच्या अंतर्गत पार्किंगला येतील. मुंबईनाका सर्कलच्या उजव्या बाजूने राष्ट्रवादी भवनकडील सर्व्हिसराेडने वडाळा नाका चाैफुली, घाेडेस्वारबाबा दर्गाह, टाकळीराेडने लक्ष्मीनारायण घाटावर जातील.

परतीचामार्ग- क्रमांक : स्नानानंतरपेरिना आईस्क्रीम, एमएसईबी सबस्टेशनजवळील प्लॉटच्या रस्त्याने मुंबई रोडने महामार्ग एसटी बस स्टँडकडे येतील.

परतीचामार्ग : अमृतविनायक हॉस्पिटल काशीमाळी समोरून महामार्ग एसटी अंतर्गत पार्किंग बाह्य पार्किंग.

औरंगाबादकडून येणाऱ्या भाविकांसाठी : माडसांगवीयेथील बाह्य पार्किंगच्या ठिकाणी वाहने लावतील. तेथून सिटी बसने के. के. वाघ कॉलेजसमोरील लक्ष्मीनारायण ट्रस्टच्या जागेतील अंतर्गत पार्किंगच्या ठिकाणावर येतील.

येण्याचा मार्ग धुळ्याकडीलवाहने १० वा मैल, आडगाव शिवार येथे बाह्य पार्किंगला लावतील. तेथून बसने मेडिकल चौफुली, रासबिहारी चौफुली, डाव्या बाजूने के. के. वाघ कॉलेजसमोरील लक्ष्मीनारायण ट्रस्ट जागेवरील अंतर्गत पार्किंगला येतील. तेथून पायी द्वारका हॉटेलजवळील रॅम्पने उतरून टाकळी फाटा उजव्या बाजूने घोडेस्वार बाबा दर्गाह, शंकरनगर चौफुली डाव्या बाजूने तिगरानिया कंपनीजवळून पटेल टाइल्स, जुने मारुती वेफर्स कारखाना, लक्ष्मी नारायण घाटावर जातील.

मार्गक्रमांक - अमृतविनायक हॉस्पिटल काशीमाळी मंगल कार्यालयासमोरून मुंबई आग्रारोडवर येतील. मार्ग क्रमांक वरील उड्डाणपुलाच्या पिलर क्रमांक ८१ जवळून डाव्या बाजूने द्वारका हॉटेलजवळील रॅम्पने पुन्हा उड्डाणपुलावरून एसटीच्या अंतर्गत पार्किंग तेथून बाह्य पार्किंगपर्यंत जातील.

त्र्यंबकरोडने येणारे भाविक : ईदगाहमैदानापर्यंत अंतर्गत पार्किंगच्या ठिकाणी येतील. तेथून पायी गौरी पटांगणात स्नानासाठी जातील.

गिरणारे, दुगांव, पेठरोडकडून येणारे भाविक डोगरे वसतिगृह येथील अंतर्गत पार्किंगच्या ठिकाणी येतील. तेथून पायी यशवंतराव पटांगण, गांधी तलाव येथे स्नान करतील.