आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यमंत्र्यांच्या ताफ्यातील पाेलिस वाहनाला अपघात, इगतपुरीजवळ दुर्घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इगतपुरी- राज्यमंत्री दादा भुसे यांच्या संरक्षण ताफ्यातील इगतपुरी पोलिस ठाण्याच्या वाहनाला गुरुवारी सकाळी बोरटेंभे शिवारात भीषण अपघात झाला. या अपघातात दोन पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ नाशिकला हलविण्यात आले आहे.

राज्यमंत्री दादा भुसे हे गुरुवारी सकाळी मुंबईहून नाशिककडे जात असताना इगतपुरी पोलिस ठाण्याचे कर्मचारी घाटनदेवी मंदिरापासून या संरक्षण ताफ्यात एका सरकारी वाहनातून (एमएच १५ इए १२३) पेट्रोलिंग करीत हाेते. मात्र बोरटेंभे शिवारात पाेलिसांच्या गाडीचे समोरील टायर फुटले ही गाडी रस्त्यावर उभ्या असलेल्या टंॅकरवर (एमएच ०४ इएल ९९९९) मागील बाजूने धडकली. या अपघातात पोलिस वाहनावरील चालक डी. एस. गायकवाड यांच्यासह एस. एस. लोहरे हे गंभीर जखमी झाले. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच घोटी पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रभाकर पाटील, नितीन भालेराव, संदीप झाल्टे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी पोलिसांना तातडीने नाशिकला हलविले. याबाबत इगतपुरी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.
बातम्या आणखी आहेत...