आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदली झालेले पोलिस अजूनही तळ ठोकून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक-शहरातीलपोलिस ठाण्यांमध्ये एकाच ठिकाणी सहा वर्षांहून अधिक कार्यकाळ पूर्ण केलेल्या अायुक्तालयातील किमान दाेनशेहून अधिक कर्मचाऱ्यांच्या बदल्या होऊन दाेन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र, तरीही बदली झालेले कर्मचारी वरिष्ठ निरीक्षक बदलीच्या ठिकाणी गेल्याने अायुक्तांच्या अादेशालाच एकप्रकारे वाटाण्याच्या अक्षता लावल्याचे दिसून येत अाहे. विशेष म्हणजे, यामध्ये बहुतांश कर्मचाऱ्यांना एकाच ठिकाणी अाठ ते दहा वर्षे झाले अाहेत.
पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी पदभार स्वीकारताच कर्मचाऱ्यांच्या विनंती प्रशासकीय बदल्यांचे अादेश काढले हाेते. यामध्ये अायुक्तालयातील सर्वच पाेलिस ठाण्यांमधील पाच ते सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात अाल्या हाेत्या.
या बदल्या पारदर्शक व्हाव्यात, यासाठी स्वत: लक्ष घालून याद्या बनविण्यात अाल्याचे सांगितले जात अाहे. या बदल्यांच्या अादेशांवर संबंधितांना तातडीने नवीन बदलीच्या ठिकाणी रुजू व्हावे, असे म्हटले हाेते. या अादेशांना तब्बल दाेन ते अडीच महिन्यांचा कालावधी उलटून गेला, तरीही निम्म्याहून अधिक पाेलिस कर्मचाऱ्यांना वरिष्ठ निरीक्षकांनी त्यांच्याकडून साेडलेले नाही. यामध्ये अंबड पाेलिस ठाण्यातील तब्बल दहाहून अधिक कर्मचारी, नाशिकराेड, इंिदरानगर अाणि नियंत्रण कक्षातील तब्बल २०हून अधिक कर्मचाऱ्यांचा समावेश अाहे. यातील बहुतांशी कर्मचारी ‘प्रस्थापित’ असून, परिसरातील सर्वच प्रकारच्या व्यावसायिकांशी हिताचे संबंध जोपासले गेल्यानेच त्यांना हलविले जात नसल्याची खुद्द कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा हाेत अाहे. या कर्मचाऱ्यांना संलग्न करून घेण्याचेही प्रयत्न सुरू अाहेत. बदलीच्या ठिकाणी हे कर्मचारी गेेल्याने या कर्मचाऱ्यांवर वचक राहिला नसल्याची चर्चा अाहे.

अंबड पाेलिस ठाणे ठरतेय वादग्रस्त
पोलिसठाण्यात सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे बहुतांश कर्मचारी असून, त्यांच्या बदल्या हाेऊनही ते सरकारवाडा, गंगापूर, नियंत्रण कक्षात रुजू हाेत नसल्याने इतर कर्मचाऱ्यांकडून त्यांचीच नावे उघडपणे सांगितली जात अाहेत. त्यामुळे इतर पाेलिस ठाण्यांतील अधिकाऱ्यांचीही पंचाईत झाली अाहे.
बातम्या आणखी आहेत...