आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालेगावी 54 हजार 601 बालकांना पोलिओचे डोस

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालेगाव - विशेष पल्स पोलिओ मोहिमेंतर्गत 15 जानेवारी रोजी नऊ नागरी आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून शहरातील जवळपास 54 हजार 601 बालकांना पोलिओचे डोस देण्यात आले. याबरोबरच 21 जानेवारीपर्यंत पोलिओ कर्मचारी घरोघरी जाऊन बालकांना पोलिओचे डोस देणार आहेत.
या मोहिमेत 282 लसीकरण केंद्रांवर एकूण एक हजार 42 कर्मचारी, बालविकास प्रकल्पांतर्गत अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस, नागरी आरोग्य केंद्रातील कर्मचारी, आयएमए, निमा शाखेचे वैद्यकीय तज्ज्ञ, मनपा प्रशासनातील सर्व विभागातील विभागप्रमुख आदींनी सहकार्य केले. शहर वाहतूक शाखा कार्यालयाजवळील पोलिओ बुथचे उद्घाटन आयुक्त जीवन सोनवणे यांच्या हस्ते झाले. या वेळी आरोग्य कर्मचारी प्रशांत सूर्यवंशी व रेखा सूर्यवंशी यांनी कायदेशीर दत्तक घेतलेल्या यशराज या एक महिन्याच्या बालकास पोलिओचा डोस पाजून मोहिमेचा शुभारंभ केला.