आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॉट्सअॅप आले कामी, औरंगाबादेतून बेपत्ता प्रशांत सापडला इगतपुरीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इगतपुरी- एरवी सोशल मीडियामुळे जग जवळ आले तरी माणसे दुरावल्याचा आरोप केला जातो. पण याच सोशल मीडियामुळे जग आणि आपला माणूसही जवळ आल्याचा अनुभव औरंगाबादच्या एका कुटुंबाने घेतला.

औरंगाबादचा गतिमंद तरुण २ ऑगस्टला घरातून निघून गेला होता. बुधवारी तो इगतपुरी (नाशिक) रेल्वे स्टेशनवर सापडला. व्हाॅट‌्सअॅपवर माहितीच्या आदानप्रदानामुळे त्याचा शोध लागू शकला.
पोलिसांत तक्रार
औरंगाबाद येथील प्रशांत कृष्णगोपाल कपूर (३२) हा लहानपणापासून अपंग व गतिमंद आहे. कुटुंबीय त्याची विशेष काळजी घेत असतानाही प्रशांत २ ऑगस्ट रोजी बेपत्ता झाला. सायंकाळपर्यंत वाट पाहूनही तो न आल्याने कुटुंबीयांनी तो हरवल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती.
औरंगाबादचे पोलिस प्रवीण शिंदेंनी प्रशांतचा फोटो व्हॉट‌्सअॅपवर टाकला.
इगतपुरी लोहमार्ग ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे आणि आरपीएफ कर्मचारी महादेव महाडिक यांना ही माहिती मिळाली. बेपत्ता प्रशांत इगतपुरी स्टेशनवर फलाट क्रमांक ३ वर आढळला.
कर्मचाऱ्यांनी मोबाइलवर शेअर झालेला फोटो व प्रशांतची चेहरेपट्टी जुळवत फलाटावरचा तो तरुण प्रशांतच असल्याची खात्री केली.
कुटुंबीयांना अश्रू अनावर
प्रशांतची माहिती त्याची बहीण रीना जैन यांना देण्यात आली. त्यांनी इगतपुरीला येऊन प्रशांतला सोबत घेतले. या वेळी त्याच्या कुटुंबातील बहीण रीना जैन, राजेश जैन, श्वेता अराेरा यांना अश्रू अनावर झाले. पेढे वाटून आनंदही साजरा केला.
पोलिस कर्मचारी महादेव महाडिक व सहायक पोलिस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे यांच्यामुळेच हरवलेला भाऊ मिळाला
आहे. पोलिसांनी केलेली कामगिरी
उल्लेखनीय अाहे. - रीना जैन, बहीण
व्हॉट‌्सअॅपमुळे सापडला गतिमंद मुलगा
बातम्या आणखी आहेत...