आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साेशल मीडियामुळे राजकीय हवा गरम, राजाभाऊ वाजे-काेकाटे समर्थकांत शाब्दिक विवाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिन्नर - विकासकामाचे श्रेय काेणाचे यावरून सुरू झालेल्या वादाला साेशल मीडियावरून खतपाणी घातले गेल्याने कार्यकर्त्यांमध्ये काहीसा तणाव निर्माण झाला अाहे. शिवसेनेचे अामदार राजाभाऊ वाजे माजी अामदार माणिकराव काेकाटे यांच्या समर्थकांमध्ये यावरून चांगलीच जुंपली असून, पाेलिस ठाण्यात एकमेकांविराेधात करण्यात अालेल्या तक्रारींनतर वाजे समर्थकांनी अाता शिवसेनेची बदनामी केल्याच्या निषेधार्थ न्यायालयात खासगी फाैजदारी खटला दाखल करण्याची तयारी केली अाहे.

तालुक्याच्या पूर्व भागावर माजी अामदार माणिकराव काेकाटे यांचा अधिक प्रभाव अाहे. मात्र, कडवा कालव्याचे पाणी वडांगळी परिसरात बंधाऱ्यांचे काम यात अामदार वाजे यांनी लक्ष घातल्यानंतर त्याचे श्रेय काेकाटे यांचेच असून, वाजे अायत्या पीठावर रेघाेट्या मारत असल्याची टीका यापूर्वी साेशल मीडियावरून झाली हाेती. बंधाऱ्याच्या भूमिपूजनप्रसंगी काेकाटे समर्थकांनी निनावी फलकबाजी करत वाजे यांना लक्ष्य केल्याने तेव्हापासून वातावरण तापू लागले.

अापल्याला श्रेयवादात रस नसल्याचे सांगून राजाभाऊ वाजे यांनी त्याकडे दुर्लक्ष केले हाेते. मात्र, या नंतरही फेसबूक तसेच व्हाॅट्सअॅपवरून उभय बाजूच्या समर्थकांकडून अाराेप-प्रत्याराेपांची मालिका सुरूच राहिली. यामुळे कार्यकर्तेही संभ्रमात आहेत.

पातळी घसरल्याने कार्यकर्ते भिडले
अाराेप-प्रत्याराेपांच्या धुरळ्यात उभय बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये सरस प्रत्युत्तर देण्यासाठी जणू स्पर्धा लागली हाेती. ताेपर्यंत वातावरण चिघळले नव्हते. मात्र, तालुक्यातील दुष्काळाकडे लक्ष देण्यासंदर्भात अामदार वाजे यांनी विधानसभेत केलेल्या भाषणाची क्लिप फिरू लागल्यावर काेकाटे समर्थकांकडून त्यावर नकाे त्या भाषेत प्रतिक्रिया उमटली. त्याला शिवसेनेचे तालुकाप्रमुख दीपक खुळे, नगरपालिकेतील गटनेते विजय जाधव, पिराजी पवार अादींनी अाक्षेप घेतला. मुंबईतील वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध झाल्याचा भास या पाेस्टमधून हाेत हाेता. तसेच शिवसेना नेतृत्व वाजेंवर नाराज अाहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांच्या साेबतीने त्यांचे राजकारण सुरू अाहे. वगैरे भाष्य करून शिवसेनेला पुढच्या निवडणुकीत उमेदवार शाेधावा लागेल, असे म्हणण्यापर्यत या लेखाची मजल गेल्याने त्याखाली लेखकाचे नाव नसल्याने प्रक्षुब्ध झालेल्या शिवसैनिकांनी पाेलिस ठाण्यात धाव घेतली हा मजकूर व्हायरल करणाऱ्या नितीन ऊर्फ राजेंद्र चव्हाणके यांच्या विराेधात तक्रार केली. पाेलिसांनी जबाब नाेंदविल्यावर माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, भाजप शहराध्यक्ष पंकज जाधव, सतीश काेकाटे, एन. जे. खुळे अादिंनी त्यांची बाजू मांडली.

पाेलिस अडकित्त्यात
प्रकरणमिटविण्याचे प्रयत्न झाले तसे पेटविण्याचेही झाले. मात्र, या संदर्भात पाेलिस अडकित्त्यात सापडले. दाेन राजकीय गटांच्या वादात पाेलिसांना अाराेपाचे धनी व्हायची वेळ अाल्यावर त्यांनी हात वर केले. त्यामुळे शिवसेनेचे तालुकाप्रमुख दीपक खुळे यांनी न्यायालयात खासगी तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले. या दरम्यान दाेन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये कटुता वाढल्याचे दिसून अाले. समर्थकांनी अापल्या नावानिशी अापल्या नेत्याचे समर्थन केल्यास काही गैर नाही. मात्र नाव टाकता विराेधी नेत्यावर अाक्षेपार्ह टिप्पणी केल्याने हा वाद विकाेपाला गेला. त्याला इतरही कंगाेरे असले तरी निवडणुकीचे काेणतेही वातावरण नसताना झालेल्या या शाब्दिक दंगलीची चर्चा रंगली.
बातम्या आणखी आहेत...