आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय गुंडांकडून पोलिसाला मारहाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- द्वारका चौकात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास काही राजकीय कार्यकर्त्यांनी वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याचे नागरिकांनी सांगितले. कर्तव्य बजावणार्‍या पोलिस कर्मचार्‍यालाच मारहाण करण्यापर्यंत राजकीय गुंडांची मजल गेल्याने सर्वसामान्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

शहराचा गजबजलेला भाग असलेल्या द्वारका परिसरात दोन कार्यकर्ते दुचाकीवरून चालले असताना वाहतूक पोलिसांनी त्यांना थांबवून वाहन परवाना आणि अन्य कागदपत्रांची मागणी केली. त्यानंतर मोटरसायकलवरील दोघांनी कागदपत्रे सादर करण्याऐवजी पोलिसांनाच दमदाटी करत ‘तुम्ही आम्हाला ओळखले नाही का’, असा सवाल केला. तसेच त्या पोलिसाच्या अंगावर हातही उचलला, असेही घटना पाहणार्‍यांनी सांगितले. याबाबत पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत कोणतीही नोंद झालेली नव्हती.