आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तापली राजकीय हवा; धडाडणार तोफा, मातब्बरांच्या उपस्थितीत आज शक्तिप्रदर्शन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- वर्षभराने होणारी लोकसभा-विधानसभा निवडणूक, शिवसेना-मनसे अध्यक्षांचे राज्यव्यापी दौरे व दुष्काळी परिस्थितीवरून सुरू झालेली राजकीय धुळवड या पार्श्वभूमीवर राज्यातील बडे नेते गुरुवारी शहरात येत असल्याने उन्हाळा सुरू होण्याआधीच राजकीय हवा तापली आहे. नेतेमंडळींच्या धडाडणार्‍या राजकीय तोफा जिल्ह्याच्या राजकारणाला कोणते वळण देतात, याची उत्सुकताही निर्माण झाली आहे.

नाशिक पहिल्यापासूनच राजकीयदृष्ट्या संवेदनशील असून, शहरी भाग शिवसेना-मनसेचा बालेकिल्ला मानला जातो, तर ग्रामीण भागावर सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याइतकीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचीही पकड आहे. अलीकडच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मानणाराही एक मोठा गट सक्रिय झाला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात दबदबा ठेवण्यासाठी नाशिकचा गड ताब्यात ठेवण्याची लढाई बड्या नेत्यांमध्ये जुंपली आहे. त्यातच, निवडणुकाही वेगाने जवळ येत असल्याने हा गड ताब्यात ठेवण्यासाठीचा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. शक्य तेवढे नेते-कार्यकर्ते आपल्याकडे वळवण्यासाठी प्रत्येकाचा प्रयत्न सुरू झाला असून, त्याचाच एक भाग म्हणून नाशिकमधील राजकीय कार्यक्रमांकडे पाहिले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यव्यापी दौर्‍याला सुरुवात केली आहे. दुसरीकडे, शरद पवारांपासून कॉँग्रेस आघाडीचे बहुतांश नेते दुष्काळी दौर्‍याच्या माध्यमातून आपली व्होट बॅँक मजबूत करीत आहेत. त्यामुळे नाशिकमधील कार्यक्रमातून कार्यकर्त्यांना निवडणुकीपूर्वी नेते कशा प्रकारे बूस्ट करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.