आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकप्रतिनिधींची पहाटेच धडक; सहाही विभागात पदाधिकार्‍यांची अचानक पाहणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातपूर- डिझेल चोरीच्या घटनेनंतर पेस्ट कंट्रोल विभागाचा काळा कारभार बाहेर काढण्यासाठी आमदार वसंत गिते व स्थायी समितीचे सभापती रमेश धोंडगे यांनी पालिकेच्या सहाही विभागात पहाटे धडक दिली. या वेळी फवारणीसाठी वापरण्यात येणारे जंतुनाशक औषधे दर्जाहीन असल्याचे निदर्शनास आले.

डासांच्या निर्मूलनासाठी लाखो रुपये खर्च होत असताना डासांचा उपद्रव वाढत आहे. त्यामुळे पेस्ट कंट्रोल विभागाचा कारभार बघण्यासाठी सातपूर प्रभागाचे सभापती विलास शिंदे व नगरसेवक सलीम शेख यांनी बुधवारी सकाळी साडेसहा वाजता विभागीय कार्यालयात अचानक भेट दिली असता अनेक गंभीर बाबी उघडकीस आल्या आहेत.

अन्याय झाल्याची तक्रार : डिझेल चोरीप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केला. या प्रकाराची चौकशी होऊन न्याय द्यावा, अशी मागणी निलंबित कर्मचार्‍यांनी पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांच्याकडे केली आहे. 3 मे रोजी रात्री 8 वाजता गाडीतील डिझेल संपल्याने थांबलो होतो. त्यावेळी भद्रकाली पोलिसांनी विचारपूस न करता गुन्हा दाखल केला. हा अन्याय असल्याचे शेख इरफान, पाटकरी जुलकरनैन, समाधान सोनवणे, अनिल बारगजे, बबन टिंबे, अखलाक शेख, शाहबाज शेख, राजू भालेराव, नितीन इंगळे, मोहसीन मन्सुरी, अनिल साळवे, मुकुंद भोईर यांनी म्हटले आहे.

215 पैकी 64 कर्मचारी गैरहजर
> द्वारका चौकातील कार्यालयात 40 कर्मचार्‍यांपैकी 21 कर्मचारी गैरहजर.
> पंचवटी विभागात 40 पैकी 14 गैरहजर.
> नवीन नाशिकमध्ये 39 पैकी 9 कर्मचारी गैरहजर.
> नाशिकरोड विभागात 43 पैकी 13 कर्मचारी गैरहजर.
> सातपूर विभागात 29 पैकी आठ कर्मचारी गैरहजर.

कारवाई न झाल्यास आंदोलन
पेस्ट कंट्रोल विभागाकडून जनतेच्या आरोग्याचा खेळ होत आहे. आम्ही या गंभीर घटनेचा आयुक्तांसमोरच तीव्र निषेध केला आहे. या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी आयुक्तांकडे केली असून, संबंधितांवर कारवाई न केल्यास आम्ही सातपूर विभागातील सर्वपक्षीय नगरसेवक आंदोलन छेडणार आहोत.
-विलास शिंदे, सभापती, सातपूर प्रभाग

फवारणी परिणामकारक नाही
फवारणीसाठी पालिकेच्या वतीने लाखो रुपयांचा खर्च केला जातो. प्रत्यक्षात डासांचा आहेच. ठराविक ठिकाणांवरच प्रभावी औषधांची फवारणी केली जाते. त्याचा काहीही परीणाम होत नाही.
-सलीम शेख, नगरसेवक