आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसमधील गळती; शहराध्यक्ष बदलाचे वारे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात फेरबदलाचे वारे वाहत असून, ज्येष्ठ नगरसेवकांसह पदाधिकारी इतर पक्षांत जाण्याच्या तयारीत असल्याच्या वृत्ताने पक्षश्रेष्ठींकडून तातडीने शहराध्यक्ष बदलाची शक्यता पक्षातील अाजी-माजी पदाधिकाऱ्यांकडून वर्तवली जात अाहे. गेल्याच अाठवड्यात सिडकाे, सातपूरसह नाशिकराेड भागातील अनेक पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसला साेडचिठ्ठी दिल्याने शहराध्यक्षांच्या कार्यक्षमतेविषयीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात अाहे. या घडामाेडीत शहराध्यक्ष बदलाची चर्चा असून पुन्हा माजी शहराध्यक्षांची नावे पुढे अाली अाहेत.
प्रभागरचना त्यातील अारक्षण जाहीर हाेताच सर्वच पक्षांत पक्षांतराची लाट अाली अाहे. यात, महापालिकेत सत्तेत असलेल्या मनसेचे सर्वाधिक म्हणजेच ४० पैकी २० हून अधिक नगरसेवकांनी पक्षांतर केले अाहे. तर त्यापाठाेपाठ राष्ट्रवादी अाणि काँग्रेसमधील अाजी-माजी नगरसेवकांनी शिवसेना, भाजपची वाट धरली अाहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधून गेल्यावेळी निवडून अालेल्या १४ पैकी ११ नगरसेवक पक्षात असून, निवडणुका जाहीर हाेईपर्यंत हा अाकडा ते वर राहण्याची शक्यता एका ज्येष्ठ नगरसेवकाने बाेलून दाखविली. दाेन दिवसांपूर्वीच सातपूर ब्लाॅक अध्यक्ष अशाेक जाधव यांच्यासह दाेघा माजी नगरसेवकांनी भाजपत प्रवेश केला. तत्पूर्वी माजी नगरसेवक सिडकाेचे माजी अध्यक्ष अमाेल जाधव यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे सिडकाे सातपूरमध्ये संघटनात्मक पदाधिकारीच उरले नसून नव्या मंडळींचा शाेध घ्यावा लागत अाहे.
अशीच अवस्था काही प्रमाणात पंचवटी, नाशिकराेड जुन्या नाशिक भागातही आहे. या परिस्थितीला पक्षाच्या प्रदेशपातळीवर असलेली अनास्थाच कारणीभूत असून त्याचेच परिणाम स्थानिक पातळीवर दिसत अाहेत.

राज्य सरकारविराेधात सर्वच घटकांमध्ये असंताेषाचे वातावरण निर्माण झाले असताना त्याचा फायदा विराेधक म्हणून घेताना वेळाेवेळी अांदाेलने करून रस्त्यावर उतरण्याची गरज हाेती, मात्र, पक्षाचे पदाधिकारी केवळ राष्ट्रपुरुषांच्या जयंती, पुण्यतिथीलाच तेही बाेटावर माेजणारे इतकेच उपस्थित रहात असल्याचे चित्र अाहे.

अाठवडाभरापूर्वीच स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या तयारीसाठी विराेधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील अाणि प्रभारी भाई जगताप यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही त्याचेच पडसाद उमटले. बहुतांश पदाधिकाऱ्यांनी या बैठकीकडे पाठ फिरविली, तर काही बाेलूच दिले नसल्याने उपस्थितांनी उघड नाराजी व्यक्त केली. दरम्यान, शहराध्यक्षपदी नवीन चेहरा देण्याची तर काहींनी नुकत्याच झालेल्या मराठा समाजाच्या माेर्चात सक्रिय भूमिका बजावणाऱ्या पदाधिकाऱ्यांची वर्णी लावण्याची मागणी केली. मात्र, सद्यस्थितीत पक्षाची अवस्था बघता निवडणुकांनतर अपयशाचे खापर अापल्यावर फुटू नये याकरिता काेणीही या पदासाठी उत्सुक नसल्याचेही बाेलले जात अाहे.
बातम्या आणखी आहेत...