आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political News In Marathi ,Apposition Party Using Arson Tole, Divya Marathi

राष्ट्रवादीच्या बदनामीसाठी विरोधकांचे जाळपोळ अस्त्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड येथे वाहनांची जाळपोळ करून दहशत माजवण्याचा प्रयत्न झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाला बदनाम करण्यासाठी ‘विकास हवा की सुरक्षा’ असा मुद्दा उपस्थित करून विरोधक बदनाम करीत असल्याची तक्रार खासदार समीर भुजबळ यांनी पोलिस आयुक्तांकडे केली आहे.
नाशिकरोडमध्ये वाहने जाळपोळीची घटना घडल्यावर राजकारण सुरू झाले. या घटनेचा संबंध राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी जोडल्यामुळे भुजबळ यांनी आयुक्तांना निवेदन देऊन ही विरोधकांची चाल असल्याचे स्पष्टीकरण दिले. बदनाम करण्यासाठी जाळपोळीसारखे प्रकार सुरू झाले आहेत. लोकांचे लक्ष वेधण्यासाठी ही खेळी असल्याचा आरोप करीत भुजबळ यांनी गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणीही केली आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत सिडको भागात काही समाजकंटकांनी वाहनांची जाळपोळ केली होती. यामागे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातील वादाचे कारण असल्याचे आरोप केले गेले. या घटनेत सामान्यांच्या वाहनांचे नुकसान झाल्यानंतर झटपट कारवाई न झाल्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादीचाच हात असल्याचा आरोप विरोधकांनी केल्यावर वाद चांगलाच उफाळला होता. दरम्यान, तत्कालीन पोलिस आयुक्त व्ही. डी. मिर्शा यांची बदली होऊन पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांच्याकडे सूत्रे आली. त्यांच्या काळात गुन्हेगारीचा आलेख कमी झाल्याचेही चित्र निर्माण झाले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शहरातील गुन्हेगारी पुन्हा उफाळल्यामुळे व त्यातच निवडणुकीचे दिवस असल्यामुळे राजकीय पक्षांसह पोलिसही धास्तावले आहेत.