आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political News In Marathi, Congress Party;s Rally Issue At Nashik, Divya Marathi

काँग्रेसचा हात; ट्रॅफिक जामला साथ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- काँग्रेसचा ओबीसी रथ सायंकाळी काँग्रेस भवनासमोर प्रमुख पाहुण्यांच्या प्रतीक्षेत तब्बल दोन तास रस्त्यातच उभा करण्यात आल्याने वाहतुकीची कोंडी होऊन नागरिक हवालदिल झाले होते.
काँग्रेस कमिटीच्या ओबीसी सेलने हा रथ तयार केला असून, नाशिकमध्ये फिरून तो पुढे धुळ्याकडे रवाना होणार आहे. सायंकाळी 5 वाजता या रथाचे स्वागत काँग्रेस भवनासमोर होणार होते. रथ वेळेत आला; मात्र स्वागत करणारे राष्ट्रवादीचे उमेदवार छगन भुजबळ अन्य कार्यक्रमात व्यस्त असल्याने वेळेत पोहचू शकले नाही. त्यामुळे दोन तास रथ खोळंबून राहिला. रथासमोर छायाचित्र काढण्यासाठी पदाधिकार्‍यांची झुंबड उडाली होती. या कार्यक्रमासाठी आलेल्या पुढार्‍यांनी रस्त्यात वाहने उभी केल्याने कोंडीत भर पडली. शिवाय, याच ठिकाणी भला मोठा चित्ररथही आडवा उभा असल्याने सायंकाळी घराकडे परतणार्‍या व शनिवारची सुटी पाहून खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची मोठी कुचंबणा झाली. विशेष म्हणजे ही कोंडी फोडण्यासाठी काँग्रेसचा एकही पदाधिकारी पुढे आला नाही.
घड्याळाचा पडला विसर
ओबीसी रथाचे स्वागत पालकमंत्री छगन भुजबळ व खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते झाले. रथावर काँग्रेसच्या योजना, सोनिया गांधी-राहुल गांधी यांचे छायाचित्र व काँग्रेसचे चिन्ह पंजा इतकीच सजावट होती. मात्र, राष्ट्रवादीचे घड्याळ नसल्याने काँग्रेसनेही आता ‘एकला चलो रे’ चा नारा दिला की काय, अशी शंका उपस्थितांनी व्यक्त केली. शरद पवार व छगन भुजबळ यांचे छोटेखानी कटआउट तात्पुरत्या स्वरूपात लावले होते. पदाधिकार्‍यांची छायाचित्रे काढून झाल्यावर तेही उतरवले.