आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political News In Marathi, Mns Party Activity News In Nashik, Divya Marathipolitical News In Marathi, Mns Party Activity News In Nashik, Divya Marathi

मराठी दिनानिमित्त मनसेतर्फे ‘जागर महाराष्ट्राचा’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- मराठीचा मुद्दा पकडून मराठी मनावर आपली छाप पाडू इच्छिणार्‍या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदा मराठी दिनानिमित्त नाशिककरांना विविध कार्यक्रमांची मेजवानी देण्याची तयारी केली आहे. त्या अनुषंगाने ‘जागर महाराष्ट्राचा’ या कार्यक्रमासह विविध क्षेत्रात आपला ठसा उमटविणार्‍या मराठी तरुणांचा गौरव केला जाईल.

27 फेब्रुवारीला मराठी दिनानिमित्त ‘जागर महाराष्ट्राचा’ या कार्यक्रमाअंतर्गत दुपारी 2 वाजता तिवंधा चौक येथून सजविलेल्या पालखीत कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची प्रतिमा ठेवली जाईल. अभिनव भारत मंदिर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पालखी पुढे धुमाळ पॉइंट, शालिमार कॉर्नर, श्री संत गाडगे महाराज पुतळा व पुढे साक्षी गणेश मंदिर, तिवंधा चौक येथे पोहोचेल. सायंकाळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या मराठी युवक-युवतींचा गौरव होईल. त्यानंतर कलाकार शरद उपाध्ये यांचा राशीचक्र हा लोकप्रिय कार्यक्रम होईल.

कोल्हापूरचे ढोल पथक
या कार्यक्रमामध्ये कोल्हापूर येथील ढोल पथक सर्वांचेच आकर्षण ठरणार आहे. नाशिकचा ढोलबाजा प्रसिद्ध असला तरी नाशिकमधील या मराठमोळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने नाशिककरांना कोल्हापूरच्या ढोल पथकाचा आनंद लुटता येणार आहे. सुमारे शंभर वादकांचे हे पथक आहे.