आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political News In Marathi, Nashik Municipal Corporation Chairman Election Issue, Divya Marathi

सिडको सभापतिपदासाठी शिवसेनेची दावेदारी प्रबळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको- सिडको सभापतिपदी यंदा शिवसेनेचीच वर्णी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संख्याबळ पाहता सर्वात जास्त नगरसेवक शिवसेनेक डे आहेत. शिवसेनेत नुकताच प्रवेश केलेल्या नगरसेविका शोभा निकम यांच्यामुळे सेनेची संख्या सातवरून आठ झाली आहे.

मागील वर्षी शिवसेना-भाजपच्या पाठिंब्यामुळे मनसेचे अँड अरविंद शेळके यांच्या गळय़ात सभापतिपदाची माळ पडली होती. मागील वर्षी शिवसेना व मनसेचे संख्याबळ सारखेच होते. जनराज्य आघाडीच्या नगरसेविका शोभा निकम यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ वाढले आहे. शिवसेनेने स्थायी समिती सभापतिपदासाठी मनसेला पाठिंबा दिला होता. तशीच परिस्थिती यावर्षी राहिल्यास सिडकोचे सभापतिपद शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे.
मनसेने उमेदवार दिल्यास व माकप आणि जनराज्य किंवा इतर पक्षांनी मनसेला मदत केल्यास मनसेचा सभापती होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. शिवसेनेतीत आठ सदस्यांपैकी सुधाकर बडगुजर विरोधी पक्षनेते, वंदना बिरारी स्थायी समिती सदस्य, कल्पना पांडे माजी सिडको सभापती आहेत. उरलेल्या पाच सदस्यांमध्ये नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, उत्तम दोंदे, शोभा फडोळ, हर्षा बडगुजर, शोभा निकम यांना सभापतिपदाची संधी मिळू शकते.

दोघांची नावे चर्चेत
सिडकोचे प्रभाग सभापतिपद शिवसेनेकडे गेल्यास नगरसेवक उत्तम दोंदे किंवा शोभा निकम यांची नावे चर्चेत आहेत. सिडको सभापती निवड बिनविरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

असे आहे पक्षीय बलाबल
एकूण : 11 प्रभाग व 22 नगरसेवक
शिवसेना 8 सदस्य : सुधाकर बडगुजर, डी. जी. सूर्यवंशी, उत्तम दोंदे, कल्पना पांडे, वंदना बिरारी, शोभा फडोळ, हर्षा बडगुजर, शोभा निकम
मनसे 7 : अँड. अरविंद शेळके, सुदाम कोंबडे, अनिल मटाले, शीतल भामरे, सुवर्णा मटाले, कांचन पाटील, रत्ननाला राणे
राष्ट्रवादी 3 : राजेंद्र महाले, शिवाजी चुंबळे, कल्पना चुंबळे
काँग्रेस 2 : लक्ष्मण जायभावे, अश्विनी बोरस्ते
माकप 1 : तानाजी जायभावे
जनराज्य आघाडी 1 : डॉ. अपूर्व हिरे