आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political News In Marathi, Nitin Gadakari Rally In Nashik, Divya Marathi

‘.तर लघुउद्योगांना तीन टक्क्यांनी कर्ज’ नितीन गडकरी यांची घोषणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- केंद्रात भाजपचे सरकार आल्यास देशातील 44 कोटी असंघटित कामगारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करू, या कामगारांना जसलोकसारख्या रुग्णालयांत मोफत उपचार सुविधा देऊ, शून्य टक्के व्याजदाराने कामगारांना गृहकर्ज उपलब्ध करून देऊ, कामगारांच्या गुणवंत पाल्यांना उच्च शिक्षणासाठी कर्ज उपलब्ध करून देऊ, यांसारख्या असंख्य घोषणांचा पाऊस पाडत भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी ‘एक पाँव डटावो, गरिबी हटाओ’चा नारा दिला.

भारतीय जनता कामगार मोर्चातर्फे सिडकोतील संभाजी स्टेडियमवर झालेल्या असंघटित कामगार मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार हरिश्चंद्र चव्हाण, लक्ष्मण सावजी, विजय साने, बाळासाहेब साने, प्रा. देवयानी फरांदे, विक्रम नागरे, युनूस सय्यद आदी उपस्थित होते.

देशात शहरी लोकांचे 33 रुपये, तर ग्रामीण भागातील लोकांचे 27 रुपये प्रतिदिन आर्थिक उत्पन्न असेल, तर तो धनवान ठरविण्याची किमया काँग्रेसने केली आहे. 999 रुपयांत कोणी र्शीमंत होऊ शकतो का? भांडवलशाही, साम्यवाद व समाजवादानेही फारसे साध्य झालेले नाही. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी सांगितलेल्या अंत्योदयानेच दरिद्रीनारायणाचा विकास होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कामगारशक्तीने एकवटावे. भाजप सत्तेवर आल्यावर असंघटित क्षेत्रातील कामगारांना शिक्षण, आरोग्यासह अन्न, वस्त्र व निवार्‍याच्या सुविधा पुरविण्यावर आमचा भर असेल. शून्य टक्के व्याजदराने गृहकर्ज व शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून दिले जाईल, असेही गडकरी म्हणाले. भारतीय जनता कामगार मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रल्हाद पटेल, गोपाळ पाटील, सतीश कुलकर्णी, सुहास फरांदे, मनजितसिंग अँब्रॉल यांनी विचार व्यक्त केले.