आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political News In Marathi, Political Issue At Nashik

काम करा, नाही तर खुर्ची साेडा.. सत्ताधारी पक्षावरच अांदाेलनाची वेळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकेतील कामांच्या फायलींवर सह्या हाेत नसल्याने नाराजी असतानाच प्रभारी अायुक्त साेनाली पाेंक्षे-वायंगणकर यांनी चकवा देत भेट टाळल्याने मनसे-राष्ट्रवादीच्या नगरसेविकांनी ‘काम करा, नाही तर खुर्ची साेडा’ अशी घाेषणाबाजी करून अायुक्त कार्यालयातच बुधवारी ठिय्या अांदाेलन केले. रुद्रावतार धारण केलेल्या नगरसेविकांची समजूत काढता-काढता महापाैर व स्थायी समिती सभापतींची दमछाक झाली. अायुक्त अाल्याशिवाय न उठण्याची भूमिका घेणाऱ्या नगरसेविकांनी पदाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर अायुक्तांच्या भेटीपासून राेखणाऱ्या तीन सुरक्षारक्षकांची बदली व गुरुवारी सकाळी ११ वाजता अायुक्तांकडून फायली निकाली काढण्याची अाश्वासने मिळाल्यावरच अांदाेलन मागे घेतले.
विधानसभा निवडणुकीची अाचारसंहिता दाेन दिवसात जारी हाेण्याची शक्यता असून, या पार्श्वभूमीवर दाेन ते पाच लाखांपर्यंतच्या किकाेळ कामांच्या फायली अायुक्तांकडे पडून असल्यामुळे सर्वच नगरसेवक अस्वस्थ अाहेत. प्रभारी अायुक्त पाेंक्षे यांना दाेन्ही कार्यालयांना वेळ देणे शक्य नसल्याचे कारण अधिकारी देत अाहेत. बुधवारी वृक्ष प्राधिकरण समिती बैठकीनिमित्त महापालिकेत अालेल्या अायुक्तांची भेट घेण्यासाठी मनसे नगरसेविका सुवर्णा मटाले, दीपाली कुलकर्णी, शीतल भामरे, भाजप नगरसेविका रंजना भानसी, शालिनी पवार, राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुनीता शिंदे त्यांच्या दालनाबाहेर प्रतीक्षा करीत हाेत्या.
सुरक्षारक्षकांमार्फत त्यांनी अायुक्तांना िनराेपही पाठवला. मात्र, अायुक्तांनी बैठक संपताच मागील दरवाजाने महापालिका साेडली. बैठक संपल्यावरही अायुक्त दालनाचे मुख्य द्वार कुलूपबंद असल्याचे पाहून नगरसेविकांनी ‘अायुक्त काेठे’, अशी िवचारणा केली. त्यावर सुरक्षारक्षक उत्तर देत नसल्यामुळे नगरसेविकांचा पारा चढला व त्यांनी त्याचा जाब िवचारला. तेवढ्यात वृक्ष प्राधिकरण समिती बैठकीतून बाहेर पडलेले प्रा. कुणाल वाघ, अरविंद शेळके, डाॅ. िवशाल घाेलप हेही तेथे पाेहचले. त्यांनी अायुक्तांना प्रलंबित फायली निकाली काढण्याची िवनंती केल्याचे सांगत त्या कार्यालयातून िनघून गेल्याबाबत अाश्चर्य व्यक्त केले. त्यानंतर नगरसेविकांचा संयम सुटून त्यांनी ‘काम करायचे नसेल तर खुर्चीत कशासाठी खुर्चीत बसता’, ‘अायुक्तांचा धिक्कार असाे’, अशी घाेषणाबाजी सुरू केली. ‘शासनाला पूर्ण वेळ अायुक्त द्यायचा नसेल व प्रभारी अायुक्तांनाही सही करायची नसेल तर अायुक्त कार्यालयच बंद करा’, अशी मागणी डाॅ. घाेलप यांच्यासह नगरसेविकांनी केली. गुरुवारी सकाळी अायुक्त कार्यालयाला टाळे ठाेकण्याची मागणीही करण्यात अाली.
.. त्यामुळेच अाली ही वेळ
अायुक्तांनी फायली निकाली काढण्याचे अाश्वासन दिले अाहे. पूर्णवेळ अायुक्तासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. मात्र, त्यांच्या दुर्लक्षामुळे ही वेळ अाली.
- अॅड. यतिन वाघ, महापाैर
भेटण्यासाठी वेळ दिला नव्हता
व्यस्त कार्यक्रमातूनही महापालिकेत अाले. काेणालाही भेटण्यासाठी वेळ िदलेली नव्हती. नियमात बसणाऱ्या व महत्त्वाच्या फायली मंजूर केल्या जात अाहेत. प्रलंबित फायली गुरुवारी निकाली काढल्या जातील. - साेनाली पाेंक्षे-वायंगणकर, प्रभारी अायुक्त
महापाैर, सभापतींसह गटनेत्यांची मध्यस्थी
अांदाेलन मिटवण्यासाठी महापाैर वाघ, स्थायी समिती सभापती अॅड. राहुल ढिकले, गटनेते अशाेक सातभाई, यशवंत निकुळे यांनी मध्यस्थी केली. दरम्यान, नगरसेविकांनी अायुक्तांना फाेन करून परत येण्याची मागणी केली. मात्र, त्यांनी व्यस्त कार्यक्रमाचे कारण देत नकार दिला. महापाैरांनी ‘उद्या सकाळी फायली काढून देताे’, असे सांगितले. मात्र, नगरसेविकांनी सुरक्षारक्षकांच्या अाताच बदल्या करा, अशी मागणी केली. त्यानंतर महापाैरांनी तातडीने सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांना बाेलवून तीन कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे अादेश दिले.
‘बंगला संस्कृती’ कशासाठी?
दिवसभर कार्यालयात न येता सायंकाळी फायली बंगल्यावर मागवून निकाली काढण्याची संस्कृती थांबवा, अशी मागणी कुलकर्णी व मटाले यांनी केली. यापुढे एकही फाइल बंगल्यावर पाठवू नये, अशी मागणी त्यांनी केली.
संतप्त नगरसेविकांनी विचारले हे प्रश्न
* मनसेची सत्ता असताना अायुक्तच सही करीत नसतील तर नवनिर्माण कसे करायचे?
* महापाैर, सभापतींनाही भेट नाकारली जाते, ही मुजाेरी नाही का?
* लाेकांची कामे करायची नसतील तर प्रभारी खुर्ची व पगार कशासाठी घेतला जाताे?
* मागील दरवाजाने निघून जात लाेकप्रतिनिधींना चकवा देणे हा मतदारांचाही अपमान नाही का?
* प्रभारी अायुक्तांनी सही करू नये, अशी तरतूद काेणत्या कायद्यात अाहे?