आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political News In Marathi, Ramdas Aathawale Rally Issue At Nashik, Divya Marathi

विद्रोही बोलण्यानेच मिळतात हक्क- आठवले यांचे प्रतिपादन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गोड किंवा चांगले बोलून नव्हे, तर विद्रोही बोलूनच हक्क मागावा लागतो आणि त्यावेळीच तो मिळतो, असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी केले. नाशिकरोड येथील प्रभाग क्रमांक 36 मध्ये नगरसेविका ललिता संजय भालेराव आणि नगरसेवक नीलेश शेलार यांच्या प्रयत्नातून बांधण्यात आलेल्या लोककवी वामनदादा कर्डक जलकुंभाच्या उद्घाटन सोहळ्यात ते रविवारी बोलत होते. शिवाजीनगर येथे पालिकेचे पाणीपट्टी कार्यालय आणि भीमनगर येथ्ेा स्तंभाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले.
ते पुढे म्हणाले की, जाती-जातींत तेढ निर्माण करण्याचे काम काँग्रेस करीत आहे, दलितांसह सर्वांवर अन्याय करणारी मानसिकता ही काँग्रेसने निर्माण केली आहे. प्रारंभीच्या काळात आंबडेकरी चळवळ सर्वदूर पसरवण्यात नाशिकचा मोठा वाटा आहे. राज्यात शिवशक्ती व भीमशक्ती एकत्र आल्यानेच विकास होईल, असे विचार बाळासाहेब ठाकरे यांनी मांडले होते. त्यामुळे शिवसेनेत आल्याचे ते म्हणाले.
नगरसेविका ललिता भालेराव यांनी प्रास्ताविक केले. शिवेसना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, प्रभाग सभापती सुनीता कोठुळे, नगरसेवक सूर्यकांत लवटे, स्थायी समिती सदस्य सुनील वाघ, माजी नगरसेवक संजय भालेराव, प्रकाश लोंढे उपस्थित होते.
मनसे नगरसेवक शेलार गैरहजर
आरपीआयच्या नगरसेविका ललिता भालेराव आणि मनसे नगरसेवक नीलेश शेलार या प्रभाग 36 च्या दोघा नगरसेवकांचा वाटा प्रभागाच्या विकासात आहे. उद्घाटन सोहळ्यास स्थानिक नगरसेवकापासून ते महापौरापर्यंत यांच्या उपस्थितीची अपेक्षा होती. महापौर येणार असल्याचे सूत्रसंचालकही सांगत होते.