आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political News In Marathi, Shivsena Elect Chairman Election

सिडकोच्या प्रभाग सभापतिपदासाठी मनसेच्या माघारीमुळे शिवसेनेचा सभापती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको- सिडकोच्या प्रभाग सभापतिपदासाठी शनिवारी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे उत्तम दोंदे यांची अविरोध निवड झाली. मनसेचे अनिल मटाले यांनी माघार घेतल्यामुळे दोंदे यांचा सभापतिपदाचा मार्ग सुलभ झाला. 22 सदस्यांच्या प्रभागात सर्वात जास्त संख्याबळ शिवसेनेचे होते. यात जनराज्य, माकप, राष्ट्रवादी व काँग्रेस या सर्वांचीच मते निर्णायक ठरणारी होती. मात्र, सर्वांनी तटस्थ भूमिका घेतल्याने मनसेने थेट शिवसेनेला पाठिंबा दिल्यासारखे झाल्याने समीकरण बदलले.

निवडणूक निर्णय अधिकारी रावसाहेब भागडे, नगरसचिव अविनाश देशमुख, विभागीय अधिकारी आर. आर. गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी दुपारी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. या वेळी शिवसेना व मनसेचे नगरसेवक, विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, माजी सभापती अरविंद शेळके, डी. जी. सूर्यवंशी, सुदाम कोंबडे, नगरसेविका कांचन पाटील, रत्नमाला राणे, कल्पना पांडे, शोभा निकम, शोभा फडोळ, हर्षा बडगुजर, वंदना बिरारी, सुवर्णा मटाले आदी उपस्थित होते. माघारीसाठी 15 मिनिटे उरली असताना मनसेच्या अनिल मटाले यांनी माघार घेतली. त्यामुळे भागडे यांनी शिवसेनेचे उत्तम दोंदे यांना विजयी घोषित केले. त्यांच्या निवडीचे सर्व नगरसेवकांनी स्वागत केले. या वेळी उपमहापौर सतीश कुलकर्णी, शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते, दत्ता गायकवाड, तानाजी फडोळ, बंटी तिदमे आदी उपस्थित होते.