लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांनाही बसल्याचे चित्र असून, गोदावरी किनार्यावरील घाट विकासाच्या शंभर कोटी रुपयांच्या पाच कामांनाही त्यामुळे ब्रेक बसणार आहे. दरम्यान, विशेष बाब म्हणून शासनाची परवानगी घेऊन घाट विकासाची कामे पूर्ण करण्यासाठी पाटबंधारे खात्याकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.
2015 मध्ये होणार्या सिंहस्थ कुंभमेळ्याला 75 लाखांपेक्षा अधिक भाविक येण्याची शक्यता आहे. रामकुंड परिसरातील घाटावर स्नानासाठी गर्दी होत असल्यामुळे यंदा प्रशासनाने शहरातून वाहणार्या गोदावरीच्या किनार्यावर अनेक ठिकाणी घाट बांधण्याचे नियोजन केले आहे. जेणेकरून भाविकांच्या गर्दीचे विकेंद्रीकरण होणार आहे. दरम्यान, 4 मार्च रोजी जलसंपदा खात्याने शहरातील पाच प्रमुख घाटांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली. यातील जवळपास सर्वच कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, त्याच वेळी आचारसंहिता लागू झाल्यामुळे आता कार्यारंभ आदेश देण्यास अडचण होणार आहे. मे महिन्यापर्यंत आचारसंहितेचा अंमल असल्यामुळे त्यानंतर पुढील प्रक्रिया पाटबंधारे खात्याला करावी लागेल. त्यातून कामांना विलंब झाल्यास त्याचा फटका सिंहस्थ नियोजनाला बसेल. या पार्श्वभूमीवर विशेष बाब म्हणून शासनाकडून परवानगीसाठी पाटबंधारे खात्याकडून प्रयत्न सुरू झाले आहे.
शासनाकडे परवानगी मागणार
4गोदावरी नदीच्या तिरावर घाट बांधणीची कामे महत्त्वाची असून, ही कामे पूर्ण करण्यासाठी साधारण आठ ते नऊ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. मे महिनाअखेरपर्यंत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असणार आहे. या पार्श्वभूमीवर सिंहस्थाच्या कामांना विशेष बाब म्हणून प्रक्रियेसाठी मान्यता मिळावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल. त्यास परवानगी मिळाल्यास ही कामे पूर्ण होतील.
सिंहस्थासाठी विशेष परवानगी घेऊन काम पूर्ण करण्याचे प्रयत्न
शंभर कोटींच्या पाच कामांना ब्रेक; काम लांबल्यास सिंहस्थ नियोजन कोलमडणार
गोदावरीच्या उजव्या तीरावर टाळकुटेश्वर पूल ते कन्नमवार पूल
‘ब’ : कन्नमवार पुलाच्या निम्न बाजूस
गोदावरीच्या डाव्या तीरावर लक्ष्मीनारायण पूल ते कपिला संगम
‘ब’ : पुलाच्या उजव्या बाजूस
‘अ’ : दसक-पंचक परिसरात जनार्दन स्वामी पुलाच्या डाव्या बाजूस
टाकळी परिसरात नासर्डी संगमाजवळ
गोदावरीच्या उजव्या तीरावर टाळकुटेश्वर ते कन्नमवार पूल घाट बांधणी : 19 कोटी 52 लाख 28 हजार (लांबी 400 मीटर, रुंदी 20 मीटर : 4000 हजार चौरस मीटर क्षेत्र लागणार)
‘अ’ : कन्नमवार पुलाच्या ऊध्र्व बाजूस घाट बांधणी : 15 कोटी 89 लाख 42 हजार (लांबी 400 मीटर, रुंदी 20 मीटर : 4000 हजार चौरस मीटर क्षेत्र लागणार)
‘ब’ : कन्नमवार पुलाच्या निम्न बाजूस घाट बांधणी घाट बांधणी : 15 कोटी 19 लाख 76 हजार (लांबी 400 मीटर रुंदी 20 मीटर : 4000 हजार चौरस फूट)
गोदावरीच्या डाव्या तीरावर लक्ष्मीनारायण पूल ते कपिला संगम घाट बांधणी : 12 कोटी 39 लाख 72 हजार (लांबी 260 मीटर, रुंदी 20 मीटर : 5200 चौरस मीटर क्षेत्र लागणार)
गोदावरी नदीवर टाकळी परिसरात नासर्डी संगमाजवळ उजव्या तीरावर घाट बांधणी : 18 कोटी 18 लाख 80 हजार (लांबी 200 मीटर रुंदी 20 मीटर : 4000 हजार चौरस मीटर क्षेत्र लागणार)
‘अ’ : दसक-पंचक परिसरात जनार्दन स्वामी पुलाच्या डाव्या तीरावर घाट बांधणी : 19 कोटी 86 लाख 24 हजार (लांबी 400 रुंदी 20 मीटर : 4000 हजार चौरस मीटर क्षेत्र लागणार)
‘ब’ : दसक-पंचक परिसरात जनार्दन स्वामी पुलाच्या उजव्या तीरावर घाट बांधणी : 17 कोटी 87 लाख 58 हजार
(लांबी 400 रुंदी 20 मीटर : 4000 हजार चौरस मीटर क्षेत्र लागणार)
‘अ’ : कन्नमवार पुलाच्या ऊध्र्व बाजूस