आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसे बंडखाेर नगरसेवकांच्या प्रभागात पाेटनिवडणूक,राज्य निवडणूक अायाेगाचे अादेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महापाैरपदाच्या निवडणुकीत मनसेशी गद्दारी करून शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या दाेन्ही नगरसेवकांच्या प्रभागात पाेटनिवडणुका घेण्याचे अादेश राज्य निवडणूक अायाेगाने महापालिका अायुक्तांना दिले अाहेत. पक्षाशी बंडखाेरी करणाऱ्या नगरसेवकांचे पद अपात्र करण्याबराेबरच निवडणूक घेण्याच्या कठाेर पवित्र्यामुळे अायाराम-गयारामांना भविष्यात विचार करणे भाग पडणार अाहे.

१२ सप्टेंबर २०१५ मध्ये झालेल्या महापाैरपदाच्या निवडणुकीत मनसेचे नीलेश शेलार शाेभना शिंदे या दाेन नगरसेवकांनी बंडखाेरी करून सेना उमेदवार बडगुजर यांना मतदान केले. मात्र राष्ट्रवादी, काँग्रेस, अपक्ष यांच्यासाेबतच्या महाअाघाडीमुळे मनसेचे उमेदवार अशाेक मुर्तडक यांच्या गळ्यात महापाैरपदाची माळ पडली. मनसेचा विजय झाला असला तरी दाेन नगरसेवकांची बंडखाेरी पक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घेतली. त्याचाच परिणाम म्हणून पक्षांतर बंदी कायद्याचा भंग केल्याप्रकरणी शेलार शिंदे यांचे नगरसेवकपद अपात्र करण्याबाबत तत्कालीन गटनेते अशाेक सातभाई यांनी कायदेशीर लढाई सुरू केली. या प्रकरणी विभागीय अायुक्तांनी काही महिन्यांपूर्वी दाेन्ही नगरसेवकांचे पद अपात्र केले. याचा अहवाल राज्य निवडणूक अायाेगाकडे पाठविला हाेता. अायाेगाने गुरुवारी राज्यातील सहा पालिका क्षेत्रातील अाठ प्रभागांत पाेटनिवडणुका जाहीर केल्या. त्यात शेलार शिंदे यांच्याशी संबंधित ३५ ‘ब’ ३६ ‘ब’ यांचा समावेश अाहे.

अाैटघटकेसाठी धडपड, पक्षांसाठी लिटमेस टेस्ट
राज्यनिवडणूक अायुक्तांनी दाेन्ही प्रभागांत पाेटनिवडणुकीचे अादेश दिले असले, तरी प्रत्यक्षात या सर्व कालावधीला दाेन महिने लागणार अाहेत. पालिकेची पंचवार्षिक निवडणूक जानेवारीच्या अासपास हाेण्याची शक्यता अाहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग पाेटनिवडणुकीसाठी काेण धडपड करणार, असा प्रश्न अाहे. दरम्यान, राजकीय पक्षांसाठी मात्र ही लिटमेस टेस्ट ठरणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...