आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपमध्ये अाता ‘नवनिर्माणा’चे वारे, सतीश कुलकर्णी यांचे गटनेतेपद काढण्याच्या हालचाली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा महापालिकेतील अावाज बुलंद करण्याच्या नावाखाली अाता ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी उपमहापाैर सतीश कुलकर्णी यांच्याकडील गटनेतेपद काढून लाेकसभा निवडणुकीनंतर पक्षचिन्हावर नगरसेवक झालेले दिनकर पाटील यांना देण्याच्या हालचाली सुरू झाल्या अाहेत. कुलकर्णी यांच्याइतका अनुभवी नगरसेवक भाजपत नसताना त्यांच्याकडील अधिकार काढण्यामागे दाेन कारणे चर्चेत असून, त्यात एक म्हणजे पक्षातील नवनिर्माणाचे सत्र दुसरे वैयक्तिक त्यांच्या वयाेमानामुळे प्रकृती अस्वास्थ्याचे दिले जात अाहे.

केंद्र राज्यातील यशानंतर भाजपला काेणत्याही स्थितीत महापालिकेची सत्ता हवी अाहे. नुसतीच सत्ताच नव्हे, तर महापाैरपदाची खुर्चीही हवी असल्याने त्यांनी मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला अाव्हान देण्याची भाषा सुरू केली अाहे. नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या दाेन प्रभागांतील पाेटनिवडणुकीत भाजपने शिवसेनेला साम-दाम-दंड असे सर्व पर्याय वापरून नामाेहरम केले. अाता महापालिकेच्या जवळपास १३० जागांवर त्यांचे लक्ष असून, त्यासाठी त्यांना महापालिकेतील सध्या सत्तेवर मनसे मित्रपक्ष असूनही चिमटे घेणाऱ्या शिवसेनेला जेरीस अाणण्याचा प्रयत्न अाहे. त्यासाठी त्यांना बाेलघेवड्या पदाधिकाऱ्यांची गरज असून, भाजपत असे अनेक नेते असले तरी, त्यांना महापालिकेतील प्रश्न समस्यांची पुरती जाण नसल्यामुळे नेमकी काेणाला संधी द्यावी असा प्रश्न अाहे.

प्रतिस्पर्ध्यावर हल्ला करताना स्वत:च शिकार हाेणार नाही याचीही दक्षता भाजप घेत अाहे. सध्या महापालिकेत काेणत्याही पक्षाचे स्वतंत्र असे प्रवक्ते नाही. ही जबाबदारी गटनेतेच पार पाडतात. विद्यमान गटनेते कुलकर्णी यांच्याकडे प्रदीर्घ अनुभव असला तरी, त्यांचा स्वभाव मवाळ भाजपच्या जुन्या विचारसरणीचाही पगडा अाहे. त्यामुळे सहसा काेणालाही दुखवता काम करण्याची त्यांची शैली अाहे. मात्र, या शैलीचा उपयाेग पक्षाला हाेणार नाही, असे अाता स्थानिक पातळीवरील नेतृत्वाची धुरा सांभाळणाऱ्यांना वाटू लागले अाहे. पक्षाचा अावाज खणखणीत ठेवण्यासाठी त्यांना अाक्रमक चेहऱ्याची गरज असून, अलीकडेच अशा नगरसेवकाचा शाेधही घेतला जात अाहे. त्यात जुन्या-जाणत्यांमधून संभाजी माेरुस्कर यांना यापूर्वी संधी दिल्यामुळे त्यांच्याकडे पुन्हा जबाबदारी साेपवली तर विराेधाची शक्यता अाहे.

त्यात प्रा. कुणाल वाघ यांचे वक्तृत्व चांगले असले, तरी त्यांची पहिलीच टर्म अाहे. या पार्श्वभूमीवर पक्षात नवीन असले तरी, अनुभवी म्हणून दिनकर पाटील यांचा पर्याय विचारात घेतला जात अाहे. पाटील यांना महापालिकेच्या प्रश्नाची चांगली जाण असून, त्यांचा पाठपुरावा बघता पक्षाला फायदा हाेण्याची अाशा वाटत अाहे. या पार्श्वभूमीवर कुलकर्णी यांच्याएेवजी पाटील यांना गटनेतेपद दिले जाण्याची शक्यता अाहे.

ज्येष्ठ पदाधिकारी अाता रडारवर
भाजपतील काही तरुण नेत्यांना जुन्या विचारसरणीच्या नेत्यांची दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत अडचण भासत असल्याचे एका पदाधिकाऱ्याने खासगीत सांगितले. त्याचाच एक भाग म्हणून लालकृष्ण अडवाणी यांच्यापासून तर अनेक जुने नेते सध्या पक्षापासून दूर सारले गेलेत. या माेठ्या नेत्यांची ही अवस्था तर अामच्यासारख्यांचे काय, असे म्हणत अाहे त्या स्थितीवर भाष्य करण्यास संबंधिताने नकार दिला.
बातम्या आणखी आहेत...