नाशिक - लोकसभा निवडणुकीसाठी विविध पक्षांची उमेदवारी जाहीर होण्यास बराच कालावधी असला तरी इच्छुक उमेदवारांनी मात्र प्रचाराचा र्शीगणेशा केला आहे. घरोघरी परिचयपत्रांचे वितरण करण्यासह वैयक्तिक गाठीभेटी सुरू झाल्या आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत मिस्ड कॉल व मोबाईलवर संपर्काचा फंडा जोरकसपणे वापरला जात आहे.
सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारीअखेरीस जाहीर होण्याची शक्यता आहे. साधारणत: निवडणूक जाहीर होण्याआधी 15 दिवस उमेदवार जाहीर होतात. बलवान पक्षांचे उमेदवार ठरल्यासारखे असल्याचे बोलले जात असले तरी सर्वच पक्षांत एकापेक्षा अधिक इच्छूक आहेत.
उमेदवारीसाठी प्रयत्न करण्याबरोबरच या मंडळींनी वैयक्तिक गाठीभेटींसह सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावण्यास प्रारंभ केला आहे. विशेषत: एकाच ठिकाणी हजारो मतदारांशी संपर्क होऊ शकणारे लग्नसमारंभ तर टाळलेच जात नसल्याचे दिसते आहे. विवाह सोहळ्यांतील भाषणे व त्यांची लांबीही वाढली आहे.
पुढील स्लाइडमध्ये, काका-पुतण्यांचे समीकरण