आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हिपने उधळले बंडखाेरांचे मनसुबे, सबुरीचा मार्ग चाेखाळण्याची वेळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- पक्षादेशाचे उल्लंघन केल्यास नगरसेवकपद गमवावे लागण्याच्या भीतीने ग्रस्त झालेल्या नगरसेवकांना सबुरीचा मार्ग चाेखाळण्याची वेळ बुधवारी (दि. १३) प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत अाली. पश्चिम प्रभागात काँग्रेसचे शिवाजी गांगुर्डे पाच मतांनी निवडून अाले. तर पूर्व प्रभागात राष्ट्रवादीच्या नीलिमा अामले पंचवटीत मनसेच्या रुची कुंभारकर यांची अविराेध निवड झाली. त्यामुळे मनसे काँग्रेसला दाेन, तर शिवसेना राष्ट्रवादीला प्रत्येकी एक सभापतिपदाची प्राप्ती झाली अाहे.

पश्चिम प्रभागातील एक उमेदवार याेगिता अाहेर यांनी एेनवेळी निवडणुकीकडे पाठ फिरविल्याने काँग्रेसचे शिवाजी गांगुर्डे यांना त्यांच्या विराेधात निवडणूक लढवावी लागली. शिवसेना-भाजप सदस्य, मनसेतून शिवसेनेत गेलेले अॅड. यतिन वाघ भाजपमध्ये गेलेल्या माधुरी जाधव मतदानाच्या वेळी अनुपस्थित राहिल्याने गांगुर्डे यांना पाच मते मिळाली. अाहेर यांना एकही मत मिळाले नाही. गांगुर्डे अाहेर यांच्यासह मनसेच्या सुनीता माेटकरी यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला हाेता. गेल्यावेळी महाअाघाडी करून मनसेच्या उमेदवाराला संधी देण्यात अाली हाेती. यंदा मात्र मनसेच्या गाेटातील दाेघे नगरसेवक अन्य पक्षात गेल्याने अाणि महाअाघाडीतील काँग्रेसचेच दाेघे उमेदवार रिंगणात असल्याने माेटकरी यांनी माघार घ्यावी लागली. दुसरीकडे, शिवसेना अाणि भाजपकडून काेणीही उमेदवार नव्हते. त्यामुळे या सदस्यांनी निवडणूकस्थळी येणेच टाळले. अामदार सीमा हिरे प्रा. देवयानी फरांदे यांनी सभास्थळी येऊनही मतदान करणे टाळले. गांगुर्डे यांना त्यांच्यासह उत्तम कांबळे, राष्ट्रवादीच्या छाया ठाकरे, मनसेच्या सुजाता डेरे सुरेखा भाेसले यांनी मतदान केले.

चार वर्षांत पक्षाने काय दिले?
शस्त्रक्रियाझाल्यामुळेमी निवडणुकीला उपस्थित राहू शकले नाही. गेल्या चार वर्षांत मला पक्षाने एकही महत्त्वाचे पद दिले नाही. पश्चिम प्रभाग सभापती म्हणून मला उमेदवारीची अपेक्षा हाेती. - याेगिता अाहेर, नगरसेविका,काँग्रेस

अहवाल श्रेष्ठींकडे पाठवणार
काँग्रेसच्यानगरसेविकायाेगिता अाहेर यांना व्हिप बजावण्यासाठी संपर्क साधला हाेता. परंतु, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यांनी अर्ज मागे घेतल्याने या सर्व प्रकाराबाबतचा अहवाल मी पक्षश्रेष्ठींकडे पाठवणार अाहे. - शरद अाहेर, शहराध्यक्ष,काँग्रेस

पाणीप्रश्न सोडविणार..
जुने नाशिकसहपूर्व विभागातील १२ प्रभागात पाण्याची मोठी समस्या असून सर्वप्रथम पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देणार आहे. - नीलिमा आमले, सभापती,पूर्व प्रभाग


प्रलंबितकामे मार्गी लावू
प्रलंबितकामेमार्गी लावणार अाहे. पुरेसा सुरळीत पाणीपुरवठा हाेईल, यासाठी प्रयत्नरत राहीन. - रुची कुंभारकर

प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध
पश्चिमप्रभागातीलसर्वच वाॅर्डांच्या विकासासाठी मी प्रयत्न करेन. पाणीबचतीसाठी जागृती करताना स्वच्छता अाणि अाराेग्य अबाधित राहण्यासाठीच्या उपाययाेजनांवर माझा भर असेल. निवडणुकीदरम्यान अालेली कटूता विसरून केवळ कामांना प्राधान्य देऊ. - शिवाजी गांगुर्डे, सभापती,पश्चिम प्रभाग
पुढीलस्लाइड्सवर पाहा, कोठे कोण.....
बातम्या आणखी आहेत...