आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौरपदासाठी डावपेच: शिवसेना मनसेला सोबत घेण्याचा होत आहे प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शिवसेनामनसेतील दुरावा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दोघांची एकत्र येण्याची शक्यता कमी असल्याचे बघून आता भाजपने दोघांसोबत महायुतीद्वारे महापौरपद मिळवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. सेना मनसेच्या नेत्यांशी याबाबत चर्चा करून महापौरपद मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. विधानसभेच्या तोंडावर संभाव्य महायुतीमुळे राजकीय पटलावर कसे तरंग उठतात, याचीही चाचपणी भाजपकडून केली जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
पालिकेत सध्या मनसे भाजपची युती तुटल्यातच जमा आहे. मात्र, दुसरीकडे भाजपला शिवसेनेसोबत गेल्यास महापौरपद मिळवणे अवघड आहे. अशा परिस्थितीत मनसेला पुन्हा एकदा कुरवाळण्याचे प्रयत्न सुरू झाले असून, मध्यंतरी महापौरपदासाठी पाठिंबा देणाऱ्या पक्षासोबत युती करण्याची तयारीही भाजपने दाखवली होती. मात्र, िशवसेनेसोबत युती केल्यास संख्याबळ ४५ पर्यंतच जाणार आहे. मनसेबरोबर युती केल्यास मात्र संख्याबळ साठपर्यंत जाऊ शकते. अशा परिस्थितीत मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस, माकप अपक्ष तटस्थ राहतील, असे गृहीत धरून सत्ता समीकरण जुळवणे भविष्यात भाजपसाठी अडचणीचे ठरणार आहे. सभागृहातील संख्याबळ कमी असल्यामुळे महत्त्वाची कामे रोखली जाण्याचीही भीती आहे. नेमकी हीच बाब ओळखून भाजपने शिवसेना मनसे या दोघांनाही एकत्र आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतील पक्षाचे ज्येष्ठ नेते राज उद्धव ठाकरे या दोघांच्याही संपर्कात असल्याचे सांगितले जाते.
मनसेपेक्षासेनेचे पारडे जड :मनसेचा विचार केला तर राज ठाकरे यांनी स्थायीच्या सभापतिपदाच्या निवडणुकीतही फारसा रस घेतला नव्हता. विधानसभेच्या तोंडावर त्यामुळे महापौरपदासाठी ते प्रतिष्ठा पणाला लावण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा भाजप सेनेबरोबर जुळवण्याची खेळी होऊ शकते, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. सेनेतील इच्छुकांत वजनदार नेत्यांचा सहभाग बघता भाजपला खरे आव्हान त्यांचेच असेल, असे चित्र आहे.
आॅगस्टची वेळ राज यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी दिली.
पर्यंत संख्याबळ मनसेबराेबर भाजपने युती केल्यास जाऊ शकते.
पर्यंतच संख्याबळ भाजपने िशवसेनेबरोबर युती केल्यास जाऊ शकते

सत्तास्थापनेसाठी दोघांची घेणार मदत
शिवसेनामनसे या दोघांची मदत घेऊन महापालिकेत सत्ता स्थापन करण्याचा भाजपचा प्रस्ताव आहे. मुळात संख्याबळ कमी असताना सत्तेत काम करताना अडचणी येतात. विरोधकांना त्याचा फायदा होतो. त्यामुळे भाजप या दोन पक्षांश दलजमाई करून त्याद्वारे महापालिकेत सत्ता समीकरण जुळवेल. लक्ष्मणसावजी, शहराध्यक्ष,भाजप