आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसपीव्हीसाठी भाजप अाक्रमक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मनसे-अपक्षांपाठाेपाठ शिवसेनेने एसपीव्हीविराेधात दंड थाेपटल्याचे पाहून अाता भाजपने अाक्रमक भूमिका घेत अार-पारची लढाई सुरू केली अाहे. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांची भेट घेत एसपीव्ही वगळून ठराव अाल्यास शासनामार्फत हस्तक्षेप करून विखंडित करण्याची भूमिका घेण्याचा इशारा दिला. स्मार्ट सिटीत महापाैरांसह विराेधी पक्षनेता, गटनेता अन्य सर्वांना सामावून घेण्याचे बदल करण्याची केंद्र शासनाची तयारी असल्याचाही दावा गटनेते संभाजी माेरूस्कर यांनी केला.

शनिवारी भाजप अामदार देवयानी फरांदे यांनी महापाैर, उपमहापाैरांवर हल्लाबाेल केल्यानंतर रविवारी तातडीने ‘रामायण’ येथे सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक झाली. त्यात भाजप वगळता सर्वांनी एसपीव्हीला विराेध केल्यामुळे साेमवारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अायुक्तांची भेट घेतली. यावेळी विजय साने यांनी स्मार्ट सिटी एसपीव्हीसहीत मंजुरीला सर्वांचा पाठिंबा असताना प्रत्यक्षात भलताच ठराव अाल्याचे सांगितले. गटनेते संभाजी माेरूस्कर यांनी स्मार्ट सिटीला यापूर्वीच सर्व अटी-शर्तीने मंजुरी दिली असून, अाता करवाढ हाेऊन स्थानिकांचा समावेश नसेल अशी काेणाची भीती असेल तर त्यात बदल करून सर्वांना सामावून घेतले जाणार अाहे. अायुक्तांनी बहुमत बघून स्मार्ट सिटीचा प्रस्ताव एसपीव्हीसहीत कसा मंजूर हाेईल हे बघावे, अशीही सूचना त्यांनी केली. यावेळी वसंत गिते, सुनील बागुल, सतीश कुलकर्णी, प्रा. कुणाल वाघ, प्रताप मेहराेलिया, रंजना भानसी, शालिनी पवार, सुनील खाेडे, सचिन ठाकरे अादी उपस्थित हाेते. अायुक्तांनी महापाैर जाे ठराव देतील ताे शासनाला पाठवला जाईल, महासभेच्या ठरावात हस्तक्षेप करण्याचे अापल्याला अधिकार नसल्याची राेखठाेक भूमिका मांडली.

भाजपचा ‘प्राेटाेकाॅल’
अायुक्तांनी महासभेतील मेरिट पाहूनच तटस्थपणे निर्णय घेण्याची मागणी गटनेते माेरूस्कर यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी ज्येष्ठ नेते विजय साने, सतीश कुलकर्णी, वसंत गिते, सुनील बागुल, सचिन ठाकरे अादी उपस्थित असताना गटनेते म्हणून माेरूस्कर यांनीच मत व्यक्त करत भाजपचा ‘प्राेटाेकाॅल’ दाखवून िदला. यापूर्वी अामदार देवयानी फरांदे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी वगळता अन्य दाेन अामदारांनी भूमिका मांडली नव्हती.
बातम्या आणखी आहेत...