आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्सवाचे निमित्त; निवडणुकीची माेर्चेबांधणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांकडून तयारी केली जात असून, नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून आपली ओळख प्रस्थापित केली जात आहे. इंदिरानगरसह पाथर्डी फाटा परिसरात विविध राजकीय सामाजिक मंडळांकडून रास दांडियाच्या निमित्ताने हजारो रुपयांचे बक्षिसांची रोज लयलूट केली जात अाहे. लहान मुले, तरुण-तरुणी आणि महिलांसाठी खास स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याने दांडियाच्या उत्सवाला उधाण आले आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांसह सेलिब्रिटींची उपस्थिती सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

पुढील वर्षभरानंतर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजणार आहे. निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांकडून आपापल्या भागात ओळख निर्माण करून प्रचार प्रसार करण्यासाठी यंदा नवरात्रोत्सवानिमित्त दांडिया रास भरविण्यात आला आहे. त्या शिवसेनाप्रणीत गणेश युवा मित्रमंडळाचे अध्यक्ष गणेश जाधव यांच्या वतीने वडाळा-पाथर्डी रस्त्यालगत भव्य दांडिया भरविण्यात आले असून, विजेत्यांना बक्षीस म्हणून ३२ इंची एलइडी टीव्ही, तसेच व्दितीय क्रमांसाठी वॉशिंग मशीन, तृतीय क्रमांकासाठी फ्रीज आणि वेशभूषेसाठी रोख बक्षीस दिले जाणार अाहे. सह्याद्री युवक मित्रमंडळांच्या वतीने चेतनानगर येथे श्रीकृष्ण मंदिरासमोर दांडिया, तर चेतनानगर येथील भाजपचे साहेबराव आव्हाड यांनी बाजीराव फाउंडेशनच्या माध्यमातून नवरात्राेत्सवात दांडिया किंग आणि क्वीन तसेच उत्कृष्ट वेशभूषा अशा विविध बक्षिसांची लयलूट केली जाणार आहे.

तसेच नगरसेवक सतीश सोनवणे यांच्या युनिक ग्रुपच्या दांडियाला महिलांची मोठी गर्दी होत आहे. विजेत्या महिलांसाठी पैठणी बक्षीस म्हणून दिली जाणार आहे. तर, पाथर्डीतील ज्ञानेश्वरनगर येथील बाळकृष्ण शिरसाठ यांच्या शिवकृपा फ्रेंड सर्कलतर्फे विजेत्यांसाठी होंडा अॅक्टिव्हासह तब्बल १०० बक्षिसांचे वाटप केले जाणार आहे. पाथर्डी फाटा येथील माजी नगरसेवक संजय नवले यांच्या चतुशंृगी मित्रमंडळातर्फे श्री स्वामी समर्थनगरमधील सप्तशंृगी मंदिर आवारात महिलांसाठी दांडिया रासचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्या महिलांना बक्षिसांचे वाटप केलेजात असून, या दांडिया उत्सवात आमदार सीमा हिरे, माजी आमदार वसंत गिते यांनी भेट दिली.

गुडघ्याला बाशिंग
गणेश युवा मंडळाच्या दांडिया रासमध्ये अभिनेत्री अक्षया गुरव, अामदार योगेश घोलप, नाशिकरोड विभागाचे सभापती केशव पोरजे, मंडळाचे संस्थापक गणेश जाधव यांनी असा ठेका धरला.