नाशिक - नगरसेवक दिनकर पाटील माजी महापाैर दशरथ पाटील यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या शिवाजीनगर, श्रमिकनगर ध्रुवनगर या परिसराचा प्रभाग क्रमांक मध्ये समावेश झाला अाहे. मात्र, चार सदस्यीय प्रभागरचनेत प्रभागातील सर्वसाधारण पुरुष या जागेसाठी काका-पुतणे एकमेकांसमाेर उभे ठाकणार असल्याने या निवडणुकीत पाटील बंधूंच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला अाहे. तसेच रिपाइंचे नगरसेवक प्रकाश लाेंढे यांचाही प्रभाव असलेल्या जुन्या प्रभागात महिला अारक्षण पडल्याने त्यांनीदेखील प्रभाग मध्ये उडी घेतल्याने येथील निवडणूक लक्षवेधी ठरणार अाहे.
नव्याने जाहीर झालेल्या प्रभाग क्रमांक मध्ये श्रमिकनगर, शिवाजीनगर, ध्रुवनगर, माेतीवाला काॅलेज धर्माजी काॅलनी या परिसराचा समावेश करण्यात अाला अाहेे. दिनकर पाटील लता पाटील हे या प्रभागाचे विद्यमान नगरसेवक अाहेत. प्रभागात एकूण ४७ हजार ८३५ मतदार असून, त्यात अनुसूचित जातीच्या हजार ७९ तर अनुसूचित जमातीच्या हजार ५११ मतदारांचा समावेश अाहे. प्रभागरचनेत - अनुसूचित जाती, - अाेबीसी महिला, - जनरल महिला - सर्वसाधारण पुरुष असे अारक्षण पडलेले अाहे. यापैकी अनुसूचित जागेसाठी जुन्या प्रभाग क्रमांक २० नगरसेवक प्रकाश लाेंढे यांनी निवडणूक लढविण्याची तयारी केली असून, श्रमिकनगर परिसरात संपर्क कार्यालयदेखील थाटले अाहे. तर पुरुष सर्वसाधारण जागेसाठी विद्यमान नगरसेवक दिनकर पाटील यांच्यासमाेर दशरथ पाटील यांनी त्यांचे पुत्र प्रेम पाटील यांची उमेदवारी जाहीर केली अाहे. त्यामुळे या जागेसाठी काका-पुतणे हेच एकमेकांसमाेर लढणार असल्याने दिनकर दशरथ या पाटील बंधूंच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला अाहेे.
तिघांचा प्रचार सुरू
महापालिका निवडणुकीसाठी अद्याप काेणत्याही पक्षाने अधिकृत उमेदवार जाहीर केलेले नाहीत. तरीदेखील दिनकर पाटील यांनी पत्नी लता पाटील यांच्यासह हेमलता कांडेकर असा तिघांचा प्रचार सुरू केला असून, अनुसूचित जागेसाठी काेणता उमेदवार असणार हे मात्र गुलदस्त्यात ठेवले अाहे.