आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Politics Of Standing Committee's Chairman : All Parties Runing In Maha Alliance

राजकारण स्‍थायी समितीच्या सभापतीपदाचा : महायुतीतील सारेच पक्ष झाले सक्रिय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - कल्याण-डोंबिवलीतील सहकार्याच्या मोबदल्यात नाशिकमध्ये मनसेला स्थायी समितीचे सभापतीपद देण्याची चर्चा जोर धरत असतानाच शिवसेनेच्या दोन व मित्र पक्ष रिपाइंसह भाजपच्याही एका सदस्याने अर्ज नेल्याने हे पद महायुतीतील कोणत्या पक्षाकडे जाते याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

स्थायी सभापती निवडणुकीसाठी यंदा महाआघाडीऐवजी महायुती होण्याची चिन्हे आहेत. कल्याण - डोंबिवली महापालिकेतील मदतीच्या बदल्यात नाशिकच्या स्थायीचे सभापतीपद मिळविण्याबाबत वरिष्ठ स्तरावर बोलणी केली जात असल्याची चर्चा आहे. त्यात मनसेकडून पंचवटीतील अशोक मुर्तडक व पाथर्डीचे सुदाम कोंबडे यांची नावे अग्रभागी आहेत. मुर्तडक महापौर पदासह गेल्या वेळी स्थायी सभापती पदाच्याही स्पर्धेत होते. मात्र, त्यावेळी माघार घ्यावी लागल्याने निदान यंदा स्थायीसाठी ते सक्रिय झाले असल्याची चर्चा आहे. कोंबडे एका मनसे आमदाराचे निकटवर्तीय मानले जात असून त्यांनीदेखील मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

चौघांनी नेले अर्ज : मंगळवारी चार नगरसेवकांनी प्रत्येकी चार अर्ज नेले. त्यात शिवसेनेचे शिवाजी सहाणे व सूर्यकांत लवटे, रिपाइंचे प्रकाश लोंढे आणि भाजपचे बाळासाहेब सानप यांचा समावेश आहे.