आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिडकोत गढूळ पाणीपुरवठा, संतप्त महिलांकडून निषेध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको - सिडको प्रभाग २९ येथील दत्त चौक भागात गढूळ दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी महापालिका प्रशासनाचा निषेध केला. पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीत ड्रेनेजचे पाणी मिसळल्याने पंधरा दिवसांपासून या परिसरात गढूळ पाणीपुरवठा हाेत अाहे. तसेच या भागात ड्रेनेज तुंबल्याने ड्रेनेजचे पाणी येथील रहिवाशांच्या घरातील स्वच्छतागृहातून बाहेर येत असून संपूर्ण रस्त्यावर अस्वच्छ दुर्गंधीयुक्त पाणी वाहत आहे. याबाबत पालिका प्रशासनाकडे तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यावर कार्यवाही झाल्यास आंदोलनाचा इशारा महिलांनी दिला आहे. उर्वरित.पान 
सिडकोतील दत्त चौक येथे गढूळ दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा हाेत असल्याने संतप्त महिलांनी रस्त्यावर हे पाणी ओतून पालिका प्रशासनचा निषेध केला. इनसेटमध्ये बाटलीत भरलेले गढूळ पाणी. 
 
ड्रेनेज विभागाचा बेजबाबदारपणा 
महापालिकेच्या सिडकाे विभागातील ड्रेनेज विभागाच्या बेजबाबदारपणामुळे असे प्रकार घडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अनेक ठिकाणी ड्रेनेज तुंबतात. नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण केले जात नसल्याने असे प्रकार घडत आहेत. याबाबत पुन्हा असे प्रकार घडले तर जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शिवाय पावसाळ्यापूर्वी नालेसफाई होणे गरजेचे होते. ते झाल्यानेच असे प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...