आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मातीमिश्रित पाणीपुरवठ्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरातील बहुतांश भागात पंधरा दिवसांपासून मातीमिश्रित पाणीपुरवठा होत आहे. यामुळे पोटाच्या आजारांना निमंत्रण मिळत असून, नागरिकांमध्ये यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. या गढूळ पाणीपुरवठ्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असताना महापालिकेच्या जबाबदार अधिका-यांकडून मात्र केवळ काम सुरू असल्याचे उत्तर दिले जात आहे. विशेष म्हणजे गेल्या पंधरवड्यापासून ही स्थिती असतानाही त्या-त्या विभागातील नगरसेवकांचे मात्र या जिव्हाळ्याच्या विषयाकडे लक्षच नसल्याचे दिसून येत आहे.

पेठरोडवरील मेहेरधाम परिसरातील शिवतेजनगर, जुईनगर, बोरगड, म्हसरूळ तर सातपूरमधील सातपूरगाव, मळे परिसर, काॅलनी, अशोकनगर, श्रमिकनगर, नीळकंठेश्वरनगर, सावरकरनगर, अंबड-लिंकरोड, दत्तनगर, आशीर्वादनगर सिडकोतील, राणेनगर, औदुंबरनगर, उत्तमनगर, पवननगर आणि गंगापूररोड, पंचवटीतील दिंडोरीरोड, कलानगर, वडनगर, आडगाव, अशा विविध भागात सध्या असा दूषित पाणीपुरवठा सुरू आहे.

दूषित पाण्यामुळे वाढले या आजारांचे रुग्ण
दूषितपाण्यामुळे डायरिया, पोटाचे विकार, डी हायड्रेशन, या आजाराचे प्रमाण वाढले असून, शहरातील रुग्णालयांत या रुग्णांची संख्या आठ दिवसांत दुप्पट झाल्याचे दिव्य मराठी’च्या पाहणीतून समोर आले आहे. डाॅ.नितीन मेहकरकर, बालरोगतज्ज्ञ

काॅलरा, डायरियाचे रुग्ण वाढले गेल्या आठ दिवसांपासून ओपीडीमध्ये येणा-या रुग्णांची संख्या दु्पटीपेक्षा जास्त वाढली आहे. काॅलरा, डायरिया, डी हायड्रेशन यांसारख्या आजारांची बालरुग्णांची संख्या माेठी आहे, दूषित पाणी हेच त्याचे कारण आहे.
बातम्या आणखी आहेत...