आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवननगर भागात पिण्याच्या पाण्यात मांसाचे तुकडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको - पवननगरभागात पिण्याच्या पाण्यात पक्ष्याच्या मांसाचे तुकडे अाल्याचा गंभीर प्रकार घडला. सिडकाे परिसरात अाधीच राेगाची साथ सुरू असून, त्यातच नळातून अालेल्या पाण्यात मांसाचे तुकडे अाढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले अाहे. याबाबत महिलांनी महापालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे.
सोमवारी सायंकाळी पवननगर येथे पाणीपुरवठ्यात पक्ष्याच्या मांसाचे तुकडे आढळले. नागरिकांनी याबाबत पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार केली. मात्र, नेहमीप्रमाणे त्याकडे आधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. काही नागरिकांनी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पवननगर येथील जलकुंभ स्वच्छ केला जात नसल्याचा त्यामुळेच असा प्रकार घडत असल्याचा अाराेप नागरिकांनी केला.
पवननगर भागात पिण्याच्या पाण्यात मांसाचे तुकडे आढळले.

बेजबाबदार प्रशासन
^या सर्वप्रकाराला प्रशासनाचा बेजबाबदारपणा कारनीभूत अाहे. हा अतिशय गंभीर प्रकार आहे. पाणीपुरवठा आधिकारी संजीव बच्छाव यांचे याकडे दुर्लक्ष हाेत आहे. -सुधाकर बडगुजर, नगरसेवक.

...तर अांदाेलन करू
^नागरिकांच्या आरोग्यासाठी अतिशय धोकादायक असा हा प्रकार आहे. हा प्रकार थांबल्यास आंदाेलन करू. -पवन मटाले, नागरिक.
बातम्या आणखी आहेत...