आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गढूळ पाणीपुरवठ्याने सातपूरवासीय हैराण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातपूर - शहरात साथीच्या अाजारांचे रुग्ण वाढत असताना पालिका अधिकाऱ्यांच्या, तसेच लाेकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे अस्वच्छता, गढूळ पाणीपुरवठ्याचा प्रश्न गेल्या कित्येक दिवसांपासून कायम अाहे. सातपूर परिसरात हाेत असलेल्या गढूळ तथा दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठ्यामुळे परिसरात कावीळ, पाेटाचे, संसर्गजन्य विकार जडलेल्या रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाली अाहे.
सातपूर विभागात आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे डेंग्यू, मलेरिया टायफॉइडची साथ पसरलेली असतानाच अाता पाणीपुरवठा विभागाच्या हलगर्जीपणामुळे एेन सणासुदीच्या दिवसांत कावीळ, अतिसार, पाेटाचे विकार, उलट्या तथा संसर्गजन्य अाजारांचे रुग्ण वाढू लागले असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला अाहे. सातपूर भागातील अनेक खासगी दवाखान्यांत रुग्णांची गर्दी वाढतच आहे.

या संदर्भात नागरिकांनी पालिका अधिकाऱ्यांना वारंवार सूचना करून, निवेदन देऊन तसेच आंदोलन करून परिस्थितीचे गांभीर्य निदर्शनास अाणून देण्याचा प्रयत्न केला, मात्र सुस्त अाणि निष्क्रिय अधिकाऱ्यांमुळे अाजही समस्या कायम अाहे.

या परिसरात दूषित पाणीपुरवठा
सातपूरकाॅलनी, सातपूर गावठाण, अशोकनगर, श्रमिकनगर, शिवाजीनगर, सावरकरनगर, नीळकंठेश्वरनगर, अानंद छाया, अंबड लिंक रोड, अाशीर्वादनगर, दत्तनगर, केवल पार्क परिसरात गेल्या कित्येक दिवसांपासून अशुद्ध गढूळ पाणीपुरवठा होत असून, वारंवार तक्रारी करूनदेखील दखल घेतली जात नसल्याने नागरिक त्रस्त आहेत.
बातम्या आणखी आहेत...