आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदाही खासगी कंपनीच्याच भरवशावर ‘प्रदूषण नियंत्रण’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - राज्यातील स्मार्ट सिटींच्या यादीत नाशिक शहराचा समावेश झाला काय, अन‌् शासकीय कार्यालयांमध्ये शहराला स्मार्ट बनविण्याचे जाेमाने प्रयत्न सुरू झाले. मात्र, इतर विभागांच्या तुलनेत प्रदूषण नियंत्रण मंडळाला सातत्याने वाढणाऱ्या प्रदूषणास अाळा घालण्यात अपयशच येत असल्याचे अातापर्यंतच्या अाकडेवारीवरून स्पष्ट हाेते. दिवाळीकाळात ध्वनीची पातळी माेजण्यासाठी प्रदूषण मंडळाने शहरातील मध्यवर्ती बसस्थानक, पंचवटी, दहीपूल, सिडकाे अाणि बिटकाे परिसरात यंत्रणा बसविली हाेती. मंडळाने एका खासगी कंपनीला ही पातळी माेजण्याचे काम दिले हाेते. त्यानुसार या कंपनीने ११ ते १३ नाेव्हेंबरला दिवसा अाणि रात्री अशा दाेन्ही वेळेत पातळी माेजण्याचे काम केले. यानंतर सादर करण्यात अालेल्या अहवालात अनेक धक्कादायक निष्कर्ष नाेंदविण्यात अाले असून, शहरात तीन दिवसांत सर्वाधिक ध्वनिप्रदूषण झाल्याचे निष्पन्न झाले अाहे. ‘एमपीसीबी’कडून दरवर्षी दिवाळीत आवाजाच्या प्रदूषणाचे निरीक्षण केले जाते. यंदादेखील फटाक्यांमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाची नाेंद घेण्यात अाली हाेती. मात्र, दरवर्षीच्या तुलनेत यंदा तरी प्रदूषण राेखण्यात यश येईल, अशी अपेक्षा असताना अहवालात मात्र अगदी उलट बाबी निष्पन्न झाल्याने पुन्हा एकदा मंडळाच्या नाकर्तेपणामुळे ध्वनिप्रदूषण चिंतेचा विषय ठरला अाहे.

पुरेसे कर्मचारी असूनही खासगी संस्थेला काम
प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पुरेसे कर्मचारी असतानादेखील सण-उत्सवकाळात खासगी संस्थांना लाखाे रुपये खर्च करून काम दिले जाते. नुकतेच दीपाेत्सवातदेखील ध्वनिप्रदूषणाची पातळी माेजण्यासाठी एका खासगी कंपनीला ठेका दिल्याचे खुद्द भाेसले यांनी ‘डी. बी. स्टार’ प्रतिनिधीला सांगितले. विशेष म्हणजे, कुठलीही माहिती देण्यात टाळाटाळ करीत ‘खासगी संस्थेला काम िदले असल्याने अहवालात काय अाहे, काय नाही याबाबत संबंधित संस्थेलाच माहिती विचारा, तेच सांगू शकतील’ या वाक्याचीच टेप त्यांनी वारंवार वाजवली.

अशी असावी ध्वनीची तीव्रता...
ध्वनीची तीव्रता दिवसा ७५ आणि रात्री ६५ डेसिबलपेक्षा अधिक नसावी. मात्र, गेल्या वर्षाप्रमाणेच यंदाच्या दिवाळीतदेखील प्रदूषणाने मर्यादा अाेलांडल्याचे अहवालातील माहितीवरून दिसून अाले अाहे. ११ नाेव्हेंबर ते १३ नाेव्हेंबरला दिवसा अाणि रात्रीच्या वेळी फटाक्यांच्या अावाजाच्या नाेंदी घेण्यात अाल्या हाेत्या, त्यावरून हे स्पष्ट झाले.

‘केवळ उद्याेजकांनाच भेट...’
‘डी.बी. स्टार’ प्रतिनिधीने दिवाळीतील झालेल्या ध्वनी अाणि वायू प्रदूषणाचा अहवाल मिळविण्यासाठी सातपूरमधील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाला भेट दिली असता, तेथील पाटील नावाच्या सुरक्षारक्षकाने साहेब मुंबईला गेल्याचे सांगितले. यानंतर कार्यालयातून बाहेर येणाऱ्या लाेकांना साहेब कार्यालयात अाहेत किंवा नाही, याबाबत विचारणा केली असता, ‘साहेब अातच बसले अाहेत’, असे उत्तर मिळाले. यावर प्रतिधिनीने सुरक्षारक्षकाला जाब विचारला असता, ‘केवळ उद्याेजकांना अात साेडायचे’ अशा स्पष्ट सूचना देण्यात अाल्याने असे उत्तर दिल्याची कबुली दिली. यावरून मंडळाचा कारभार कशाप्रकारे सुरू असताे, याची प्रचिती येते.

दहा वाजेनंतरही फुटले फटाके
फटाक्यांच्या अावाजाचा सर्वाधिक त्रास रात्री हाेताे. मात्र, वेळोवेळी आवाहन करूनही आणि दहानंतर बंदी असतानाही अनेक ठिकाणी माेठ्या अावाजाचे फटाके फाेडले गेल्याचे शहरातील प्रदूषणाच्या अहवालावरून दिसून अाले.

अधिकारी म्हणतात, ‘वायू प्रदूषण नाही माेजत, अहवालही नाही देता येणार...’
अाैद्याेगिकवसाहत असेल अथवा अन्य मार्गाने हाेणारे वायू प्रदूषण असेल, यावर नियंत्रण मिळवून अावश्यक उपाययाेजना करण्याचे काम प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अाहे. मात्र, अाम्ही केवळ अाैद्याेगिक वसाहतीमध्ये हाेणारे वायू प्रदूषण माेजून ते नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न करताे, असे माेघम उत्तर देत दिवाळीत फटाक्यांपासून झालेल्या वायू प्रदूषणाचा अहवाल देण्यास मंडळातील भाेसले यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला. एवढेच नाही, तर पाेलिस, महानगरपालिकेच्या संबंधित विभागाचे हे काम असल्याचे भाेसले यांनी ‘डी. बी. स्टार’ प्रतिनिधीशी बाेलताना सांगितल्याने अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेविषयीची प्रश्नचिन्ह उपस्थित झाले अाहे.

काय सांगताे अहवाल...
११ते १३ नाेव्हेंबरदरम्यान सकाळी-सायंकाळी अशा दाेन्ही वेळी खासगी कंपनीने सीबीएस, पंचवटी, दहीपूल, सिडकाे, नाशिकराेड परिसरात ध्वनी पातळी माेजली. अहवालावरून ध्वनी पातळी माेठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून येते.
गेल्या काही वर्षांपासून दिवाळीचा संबंध प्रदूषणवाढीशी माेठ्या प्रमाणावर जाेडला जात असून, दीपाेत्सवात ध्वनी वायू प्रदूषणाचे प्रमाण दरवर्षी वाढतच असल्याचे अहवालांवरून दिसून येते. अशा स्थितीत प्रदूषण नियंत्रणाची मुख्य जबाबदारी असलेले महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ (एमपीसीबी) मात्र केवळ अहवाल बनविण्याचे साेपस्कारच पूर्ण करीत असल्याचे दिसून येते. नागरिकांभाेवतीचा प्रदूषणाचा फास दिवसेंदिवस अावळला जात असताना, मंडळ मात्र खासगी कंपनीकडे जबाबदारी साेपवून कार्यमुक्त हाेण्यातच धन्यता मानत असल्याचा अनुभव पुन्हा एकदा अाला. त्यावर ‘डी. बी. स्टार’चा प्रकाशझाेत...
{कर्मचाऱ्यांकडून माहिती देण्यात दिरंगाई; संबंधित कंपनीकडूनच माहिती घेण्याचा दिला जाताे सल्ला
{पुरेसे मनुष्यबळ; तरीदेखील नियंत्रणात अपयश, केवळ अहवाल बनवण्याचेच साेपस्कार
{ दिवाळीत ध्वनिप्रदूषण नियंत्रणात ठेवण्यात प्रदूषण मंडळाला याहीवर्षी अपयश अाले, काय कारण?
अपयशअाले असे म्हणता येणार नाही. अाम्ही जनजागृतीचे काम अद्यापही करीतच अाहाेत.
{प्रदूषण नियंत्रण मंडळ दिवाळीत वायू प्रदूषणाची नाेंद घेत नसल्याचे कर्मचारी सांगतात. असे का?
याबद्दलबाेलू इच्छित नाही.
{कार्यालयात येणाऱ्या लाेकांना कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देतात. अापण कार्यालयात नसल्याचे अनेकदा सांगितले जाते?
मीकार्यालयातच असताे. ‘मला भेटू देऊ नका’ असे मी काेणत्याही कर्मचाऱ्याला सांगितलेले नाही.
{मग साेमवारी कार्यालयात असताना सुरक्षारक्षकाने ‘साहेब कार्यालयात नाही’, असे उत्तर का िदले?
याबाबततातडीने सुरक्षारक्षकाला विचारणा करताे.