आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉलिटेक्निक कॅप राउंडचे १५ जुलैपर्यंत रिपोर्टिंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे अभियांत्रिकीतील पदविका अर्थात पॉलिटेक्निकची शैक्षणिक वर्ष २०१६ २०१७ या वर्षासाठीची प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. पॉलिटेक्निकच्या प्रवेशासाठी महाविद्यालयांत फॅसिलिटेशन सेंटरही कार्यान्वित असून, विद्यार्थ्यांच्या मागणीवरून प्रवेश अर्जांच्या नोंदणीच्या विहित मुदतीत वाढ करण्यात आली होती. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर आता कॅप राउंड एकची अलॉटमेंट जाहीर झाली असून, एआरसी सेंटरवर विद्यार्थ्यांना येत्या १५ जुलैपर्यंत रिपोर्टिंग करण्याची मुदत आहे.
यंदाच्या वर्षी प्रथमच अभियांत्रिकी, आैषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय दंत वैद्यकीय या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे प्रवेश परीक्षा सीईटी घेण्यात आली. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आता स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आल्याने सर्वच परीक्षा त्यामार्फत घेण्यात आल्या. पॉलिटेक्निकच्या प्रवेशासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २९ जून होती. तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे विहित मुदतीत जुलैपर्यंत वाढ करण्यात आली. त्यानंतर दि. १० जुलै रोजी कॅप राउंड एकचे अलॉटमेंट जाहीर झाले असून, ११ ते १५ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना एआरसी सेंटरवर जाऊन रिपोर्टिंग करण्याची संधी आहे. एआरसी सेंटरद्वारे फ्रीज, स्लाइड, फ्लोट पद्धतीद्वारे प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रियेच्या फेऱ्या पार पडतील. तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रमाची नाशिक विभागात ९४ महाविद्यालये आहेत. त्यात शासकीय महाविद्यालयांची संख्या पाच असून, विनाअनुदानित महाविद्यालयांची संख्या ८९ इतकी आहे. मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल्स, कॉम्प्युटर, आयटी या विद्याशाखांच्या तब्बल २३ हजार जागा उपलब्ध आहे. पॉलिटेक्निकसाठी यंदाच्या वर्षी प्रवेश अर्जांची संख्या उपलब्ध जागांच्या तुलनेत कमी असल्याने जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे एफसी केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेशासाठीचा मार्ग सुकर हाेईल.

अशी होईल प्रवेशप्रक्रिया
१० जुलै कॅप राउंड अलॉटमेंट लिस्ट जाहीर
११ ते १५ जुलै एआरसी सेंटरवर रिपोर्टिंग करणे
१७ जुलै कॅप राउंड ची अलॉटमेंट जाहीर होईल
१८ ते २१ जुलै विद्यार्थ्यांनी रिपोर्टिंग करणे
२३ जुलै कॅप राउंड ची अलॉटमेंट होणार जाहीर
२४ ते २७ विद्यार्थ्यांनी रिपोर्टिंग करणे
बातम्या आणखी आहेत...