आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आवक घटल्याने डाळिंब 180रू किलो; किरकोळ बाजारात 180, तर घाऊक बाजारात 2200 ते 2500 रुपये क्रेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक बाजार समितीत डाळिंबाची आवक काही प्रमाणात घटल्याने चांगल्या डाळिंबाच्या दरात वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात 180 रुपये किलो, तर घाऊक बाजारात 2200 ते 2500 रुपये क्रेट (20 किलो) दर झाला आहे.

सध्या मान्सून उशिरा दाखल झाल्याने आंब्याला मागणी आहे, तर इतर फळांकडे दुर्लक्ष झाले आहे. परंतु, पाऊस पडल्यानंतर आंबा हंगाम संपतो. त्यानंतर डाळिंबाला मागणी वाढून 250 रुपये किलो दर होण्याची शक्यता असल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले.

कळवण, अकोला, संगमनेर, सिन्नर, मालेगाव, देवळा आणि सटाणा तालुक्यांतील डाळिंब उत्पादक नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंब आणतात. सध्या त्याची आवक घटत चालली असून, बाजार समितीत सुमारे सात ते आठ हजार क्रेट विक्रीसाठी येत आहेत. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या डाळिंब क्रेटच्या दरात तब्बल अडीच हजार रुपये इतकी दरवाढ झाली आहे. आज बाजार समितीत सरासरी 2000 ते 2200 रुपये क्रेटचा दर आहे. अवकाळी पावसामुळे आंबा मोठ्या प्रमाणात बाजारात आल्याने ग्राहकांनी आंब्याला विशेष पसंती दिली आहे.

परिणामी चिकू, सफरचंद आणि डाळिंबाची मागणी मात्र घसरल्याचे दिसून आले. मात्र, आता डाळिंबाची आवक कमी झाल्याने दरात वाढ होताना दिसून येत आहे.