आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातल्या सिग्नलवरही पेटणार ज्ञानाची ज्याेत...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिग्नलवर गजरा विकणारी चिमुरडी मुले पाहिल्यावर काेणालाही कणव येते.. त्यांच्या हालअपेष्टा पाहून यांना काेठून पळवून तर अाणले नसेल ना? अशी शंकाही येते. परंतु, त्यातले एखादे मूल समाेर अाल्यावर त्याच्या हातात पैसे टेकविणे किंवा हळहळ व्यक्त करण्याशिवाय फारसे काही हाेत नाही. अवेकनिंग जागृती या संस्थेने मात्र सिग्नलवरील मुलांना ‘त्यांच्या जागेवरच’ शिक्षण देण्याची याेजना सुरू केली अाहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा बालसंरक्षण विभाग, जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय नवजीवन फाउंडेशनने या मुलांचे सर्वेक्षण केले असता सिग्नलवर ७६ मुले काम करताना अाढळून अाली. शहरातील सिग्नल अाणि वर्दळीच्या ठिकाणी भिक्षा मागण्यासह गजरे वा अन्य वस्तू विकणाऱ्या बालकांचे हे सर्वेक्षण नाशिकराेड रेल्वे स्थानक, फेम थिएटर, काठे गल्ली, द्वारका, मुंबई नाका, त्र्यंबक नाका, गडकरी चाैक, शरणपूर चाैकी, गाेदाघाट, सीबीएस अादी १७ ठिकाणी करण्यात अाले. रात्रीच्या वेळी यापेक्षाही अधिक मुले भिक्षा मागताना किंवा छाेट्या वस्तू विकताना अाढळतात. या सर्वेक्षणाअाधारे संबंधित बालकांच्या पालकांचे समुपदेशन करण्यात अाले. शिवाय, त्यातील अाठ माेठ्या मुलांना बालगृहात दाखल करून त्यांच्या संगाेपनाची जबाबदारीही घेण्यात अाली. मात्र, त्यांच्या पालकांनीच त्यास विराेध करीत मुलांना पुन्हा एकदा अापल्या ‘ताब्यात’ घेतले. या मुलांना वेगवेगळ्या शाळांमध्ये प्रवेश दिले असले तरी ते शाळेत जाण्यास नाखुश असतात. ही अडचण लक्षात घेत ‘अवेकिंग जाग्रिती’ने सिग्नलसह अन्य ठिकाणासारख्या जागेवरच केंद्र स्थापन करून अशा मुलांना अनाैपचारिक शिक्षण देणे सुरू केले अाहे. मुलांमध्ये शिक्षणाची गाेडी निर्माण झाल्यावर त्यांना महापालिका किंवा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखल केले जाईल.

बालक, पालक शिक्षणाबाबत सदैव उदासीन
^बालकांचा वापर वेग-वेगळ्या गावांतील यात्रांमध्ये छाेट्या वस्तू विकण्या-साठीही मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो. या मुलांमध्ये शिकण्याची अावड तशी कमीच असते. अर्थात त्यांच्या या मानसिकतेमागे सभोवतीचे वातावरणही कारणीभूत असते. त्यांचे अाई-वडीलही त्याबाबत उत्सुक नसतात. -महेंद्र विंचूरकर, संचालक, नवजीवन फाउंडेशन

^जिल्हा बाल-संरक्षण विभाग, जिल्हा महिला बाल-विकास अधिकारी कार्यालय, नवजीवन फाउंडेशन, अाधाराश्रम अाणि अन्य काही संस्थांमधील मुलांसमवेत रस्त्यावरील मुलांची अाम्ही शुक्रवारी (दि. २०) फाळके स्मारकात सहल काढणार अाहाेत. संस्थांमध्ये राहणाऱ्या मुलांचा सहवास लाभल्यास या मुलांची मानसिकता बदलेल, अशी अपेक्षा अाहे. -गणेश कानवडे, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी
त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी...
^२० नाेव्हेंबर १९८९ राेजी संयुक्त राष्ट्र संघाने बालहक्क जाहीरनामा केला. तेव्हापासून हा दिवस बालहक्क दिन म्हणून साजरा केला जाताे. बालक हे स्वतंत्र व्यक्तिमत्व असून, त्यालाही अधिकार दिले अाहेत. त्यात जगण्याचा, संरक्षणाचा, विकासाचा अाणि सहभागाच्या हक्काचा समावेश अाहे. या दृष्टीनेच अाम्ही रस्त्यावरच्या बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात अाणत अाहाेत. -मिलिंद गुडदे, वरिष्ठ क्षेत्र समन्वयक, अवेक‌्निंग जागृती संस्था
१७ठिकाणी करण्यात अाला सर्व्हे
७६ एकूण मुले
मुली ३७
मुले ३९