आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेबसाईटद्वारे पाठवला अश्लील एसएमएस, पत्नीचे चारित्र्यहनन करण्याची पतीला धमकी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- वेबसाईटद्वारे पतीच्या मोबाइलवर एसएमस करून पत्नीची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार अंबड येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी संशयिताच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणी अंबड येथील राहणाऱ्या पीडित विवाहितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, २१ जून २०१७ पासून पतीच्या मोबाइल नंबरवर संशयिताने INFOSMS या ऑनलाइन वेबसाईटवरून पत्नीच्या नावे अश्लील एसएमएस पाठवत तिचे चारित्र्यहनन केले. तसेच, या अश्लील एसएमएसच्या माध्यमातून बदनामीची भीती दाखवली. पीडित दाम्पत्य मुंबईमध्ये असताना तेथील सायबर पाेलिसांकडे त्यांनी तक्रार केली होती. घटना नाशिकमध्ये घडलेली असल्याने मुंबई पोलिसांनी हा गुन्हा अंबड पोलिसात वर्ग केला. 

शनिवारी (दि. १४) संशयिताच्या विरोधात अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ निरिक्षक मधुकर कड तपास करत आहेत. संशयिताचा अायपी नंबर शोधण्यासाठी सायबर पोलिसांत पाठवण्यात आला आहे. लवकरच संशयिताचा माग काढत त्यास अटक केली जाणार असल्याचे कड यांनी सांगितले.  
बातम्या आणखी आहेत...