आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारपेठ ठाेकणार लक्ष्मीपूजनाला सेंच्युरी, शंभर काेटींच्या उलाढालीची चिन्हे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - वर्षातील सर्वात माेठा सण, दीपाेत्सवाला मंगलमय वातावरणात सुरुवात झाली असून गुरुवारच्या (दि. १९) लक्ष्मीपूजनाच्या पार्श्वभूमीवर मुहूर्तावरील खरेदीसाठी बाजार सजला अाहे. बुधवारी रविवार कारंजा, मेनराेड यांसारख्या प्रमुख बाजारपेठांमध्ये झेंडूची फुले, ताेरणं, पणत्या, लक्ष्मीमूर्ती, प्रसाद साहित्य खरेदीकरिता गर्दी अाेसंडून वाहत हाेती.
 
नाेटबंदी, जीएसटी या वर्षभरातील क्रांतिकारी निर्णयांनंतर बाजाराला अालेली मरगळ गत पाच दिवसांपासून झटकलेली दिसत असल्यानेच गुरुवारी दिवसभर वाहन विक्रीतील तेजी अाणि साेने खरेदीचा नाशिककर मुहूर्त साधणार अाहेत. या एकाच दिवसामध्ये सर्व क्षेत्रांत शंभर काेटींवर उलाढाल हाेण्याची शक्यता जाणकार व्यक्त करीत अाहेत. 
 
लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर नवे घर, जागा, साेने-चांदी, वाहन, हाेम अप्लायन्सेसच्या खरेदीला विशेष महत्त्व असते. वर्षातील माेठ्या मुहूर्तांपैकी महत्त्वाचा मुहूर्त म्हणून लक्ष्मीपूजन, तर लागाेपाठ येणाऱ्या मुहूर्तांचा सण म्हणून दिवाळी महत्त्वाची असते. यामुळे या दिवशी बाजारात काेट्यवधींची उलाढाल दरवर्षी हाेत असते. यावर्षीही नाेटबंदी अाणि जीएसटीच्या फेऱ्यातून व्यापारी बाहेर पडले असून, गेल्या चार-पाच दिवसांपासून बाजारात दिवाळीची राैनक पहायला मिळत अाहे. सर्वच बाजारपेठा अाेसंडून वाहत अाहेत. विक्रेत्यांनी दिलेल्या अाकर्षक अाॅफर्सचा गाेडवा खरेदी वाढवत असल्याने ग्राहकांच्याही चेहऱ्यावर समाधान पहायला मिळत अाहे. 
 
हाेम अप्लायन्सेसची विक्री वाढणार 
टीव्ही,रेफ्रीजरेटर, वाॅशिंग मशिन यासारखे हाेम अप्लायन्सेस तर साेफा, बेडरूम सेट, टीव्ही युनिट, वाॅर्डराेब यांसारख्या फर्निचरची विक्री सध्या वाढली अाहे. अगदी रुपयाही भरता अाकर्षक कर्जदराने कमीत कमी मासिक हप्त्यात फर्निचर मिळत असल्याने त्याचा फायदाही विक्री वाढण्यात हाेत अाहे. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने या विक्रीतही अाता वाढ हाेणार अाहे. 
 
वाहन बाजारात राैनक 
केंद्रसरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन अायाेग देण्याचे जाहीर केल्यानंतर वाहन बाजारात तेजीचे वारे वाहत अाहे. नुकत्याच गेलेल्या नवरात्राेत्सव अाणि विजयादशमीच्या मुहूर्तावर तब्बल अडीच हजाराच्या अासपास दुचाकी अाणि साडेसातशेच्या अासपास चारचाकी वाहने विकली गेली हाेती. त्याचाच कित्ता लक्ष्मीपूजनालाही गिरवला जाईल, अशी स्थिती अाहे. 
 
मंदी नसल्याने साेने खरेदीला पसंती 
पारंपरिक; पण गुंतवणुकीचा एक नामी पर्याय मानल्या जाणाऱ्या साेने खरेदीचे महत्त्व गेल्या काही मुहूर्तांवरील साेने विक्रीवर नजर टाकता स्पष्ट हाेते. धनत्रयाेदशीच्या मुहूर्तावर दिवसभर सराफी पेढ्यांत चांगली गर्दी हाेती. गतवर्षीइतकाच व्यवसाय झाला असून मंदी नसल्याचे सराफी व्यावसायिकांनी सांगितले हाेते. त्यांच्या मते, गुरुवारीही साेन्याचे शिक्के, बिस्किटे दागिन्यांची चांगली विक्री हाेणार अाहे. 
बातम्या आणखी आहेत...