आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोस्टातच अडकले लाखोे आधारकार्ड, अनेक लाभार्थ्यांना मनस्ताप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - केंद्रशासनाकडून राबविल्या जात असलेल्या आधारकार्ड वितरणाला टपाल खात्यातील अपुऱ्या मनुष्यबळामुळे खीळ बसली आहे. शहरातील शेकडो नागरिकांनी आधारकार्डची नोंदणी करून वर्ष लोटले तरीही त्याचे वितरण अद्याप होऊ शकले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. टपाल कार्यालयात अजूनही अनेक "आधारकार्ड' अडकली आहेत.

आधारकार्डसाठी अनेकांनी एक-दीड वर्षापूर्वी नोंदणी केली. मात्र, अद्याप त्यांना आधारकार्ड मिळालेले नाहीत. हे नागरिक टपाल कार्यालयात चकरा मारून-मारून हैराण झाले आहेत. गेल्या वर्षी सरकारने "आधारकार्ड' नोंदणीचा पहिला टप्पा पूर्ण केला. त्या वेळी नागरिकांनीही मोठ्या उत्साहाने आधारकार्ड नोंदणीसाठी केंद्रांवर रांगा लावून प्रतिसाद दिला. मात्र, त्यानंतर सर्व प्रक्रिया पार पडून साधारण तीन महिन्यांत आधारकार्ड संबंधित व्यक्तीच्या पत्त्यावर पोहोचेल असे, सांगितले जात होते. प्रत्यक्षात आता वर्ष लोटले तरी हजारो नागरिकांना आधारकार्ड मिळालेले नाही. ज्यांनी गेल्या जानेवारीत नोंदणी केली, त्यांना नव्या वर्षाच्या तोंडावरही "आधारकार्ड' मिळालेले नसल्याच्या तक्रारी आहेत. शहरातील टपाल कार्यालयात असे शेकडो आधारकार्ड सध्या पडून असल्याची बाबदेखील समोर आली आहे.
शासकीय योजनांच्या लाभासाठी आधारची सक्ती केली जात असल्याने लाभार्थी हैराण झाले आहेत. अनेकांकडे अद्यापही आधार कार्ड नाहीत. तर, पोस्टातही ऑनलाइन आधार कार्डची प्रिंट स्वीकारली जात नसल्याच्या तक्रारी आहेत. नोंदणी करूनही कार्ड मिळालेले नाहीत, अशा परिस्थितीत काय करावे, असा प्रश्न अनेकांना भेडसावतो आहे.
ऑनलाइन ‘आधार’

नोंदणीकेल्यानंतर१५ दिवसांत डेटा ऑनलाइन एंट्री केला जातो. त्यानंतरही आधारकार्ड घरपोहोच मिळाले नाही, तर यूआयडी ऑनलाइन संकेतस्थळावर जाऊन आधार कार्ड ऑनलाइन डाउनलोड करता येते. शहानवाज शेख, जिल्हाव्यवस्थापक, कार्वी अाधार एजन्सी.
वितरण सुरू आहे

आधारकार्डनोंदणी केल्यानंतर अगोदर स्पीड पोस्टद्वारे प्रत्येक नागरिकाच्या पत्त्यावर पाठविले जायचे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सर्वसाधारण पोस्टाने आधारकार्ड पाठविले जात असल्यामुळे आधार कार्ड येण्यास उशीर होत आहे. संजय फडके, मुख्यपोस्टमास्टर
बातम्या आणखी आहेत...