आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • पोस्टाच्या परीक्षेसाठी १७२९ उमेदवारांची दांडी

पोस्टाच्या परीक्षेसाठी १७२९ उमेदवारांची दांडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - टपाल कार्यालयाने रविवारी मल्टी टास्किंग स्टाफ पदांकरिता घेतलेल्या परीक्षेत विचित्र पद्धतीने शब्दश: अनुवाद करून अक्षम्य चुकांचा कळस गाठून एक प्रकारे बौद्धिक दिवाळखोरीच दाखवली. इंग्रजी प्रश्नांचे मराठी अनुवाद (भाषांतर) करताना अनेक गंभीर चुका झाल्याने परीक्षा उपस्थित परीक्षार्थींची "परीक्षा' घेणारी ठरली.

भारतीय टपाल विभागातर्फे रविवार दि. मे रोजी मल्टीटास्किंग स्टाफ (एमटीएस) अंतर्गत विविध पदांकरिता महाराष्ट्र सर्कलमध्ये परीक्षा घेण्यात आली. खासगी संस्थेतर्फे घेण्यात आलेली ही चाचणी परीक्षा शहरातील विविध १३ केंद्रांवर पार पडली.

सकाळी १० ते १२.३० या वेळेत बुद्धिमापन चाचणी, मराठी, अंकगणित, इंग्रजी भाषा अशा प्रत्येकी पंचवीस गुणांच्या चार विभागांत विभागलेली १०० गुणांसाठी ही परीक्षा घेण्यात आली. १०० गुणांसाठी १०० प्रश्न विचारण्यात आले होते. प्रश्नपत्रिकेतील सर्व इंग्रजी प्रश्नांचे मराठीत भाषांतर करताना सर्रास शब्दशः आणि अप्रचलित शब्दांचा वापर करून अनुवाद करण्यात आल्याने परीक्षार्थींमध्ये एकच गोंधळ उडाला. अशा परिस्थितीत प्रश्नांची उत्तरे माहीत असून देखील अपरिचित शब्दांत भाषांतर झाल्यामुळे उत्तरे लिहिता आली नसल्याचे कित्येक परीक्षार्थींनी सांगितले.

भारतातील पुरातन संस्कृती कोणती? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार्‍या परीक्षार्थींनाच प्रश्न पडला, तर मोबाइल फोन, भिंतीवरील घड्याळ, आयपॉड आणि लपटॉप यांपैकी "विषमला बाहेर काढा'ताना तर मोठी बौद्धिक कसरत त्यांना करावी लागली.

‘रोगपरिस्थितीत शरीराच्या कार्याच्या बदला’ला काय म्हणतात, अध:स्थ महानीलाची घडण यांच्या रक्तवाहिनींच्या मिलाफामुळे होते, श्री लंका अशा विविध प्रश्नांच्या उत्तरांवर विचार करताना परीक्षार्थींना मात्र बौद्धिक कसरत करावी लागल्याचे अनेक परीक्षार्थींनी सांगितले.

१७२९ परीक्षार्थींनी मारली रविवारी दांडी
नाशिकविभागात ५४५७ उमेदवारांपैकी ३७२८ परीक्षार्थींनी परीक्षा दिली. तर या परीक्षेत १७२९ उमेदवारांनी दांडी मारली. पोस्ट ऑफीसच्या भरती प्रक्रियेंतर्गत राज्यभरातील विविध विभागांमधील जागांसाठी खासगी संस्थेतर्फे परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते. मल्टी टास्किंग स्टाफसाठी शहरातील १३ केंद्रांवर सकाळी १० ते १२.३० या वेळत ही कनिष्ठस्तरीय परीक्षा घेण्यात आली. १७२९ उमेदवारांनी या परीक्षेत दांडी मारल्याची माहिती नाशिक मुख्यालयातील सहायक अधीक्षक पंकज कुलकर्णी यांनी दिली.