आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बटाटे किलोमागे सात रुपयांनी महागले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - बटाट्याच्या दरात किलो मागे सात ते आठ रुपयांनी वाढ झाल्याने गृहिणींचे आर्थिक गणित कोलमडले आहे. गेल्या आठवड्यात 18 ते 20 रुपयांनी विक्री होणारा बटाटा सध्या 25 रुपये किलोने विक्री होत आहे.

16 जूनपासून शाळा सुरू झाल्याने बटाटा, भेंडी आणि फ्लॉवर या भाज्यांना मागणी वाढते. मात्र, यंदा दर वाढल्यामुळे खरेदीत घट होताना दिसत आहे. संगमनेर परिसरातून येणारा बटाटा संपल्याने आता आग्र्‍याहून येणारा बटाटा विक्रेत्यांना खरेदी करावा लागत आहे. वाहतूक खर्चात वाढ व पावसामुळे उत्पादनात झालेली घट यामुळे दरवाढ होत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

कांदा व बटाट्याची दरवाढ होत असल्याने केंद्र शासनाने अनुक्रमे 300 आणि 450 डॉलर प्रतिटन निर्यात मूल्य लावले आहे. त्यामुळे निर्यातीत घट होऊन दर आवाक्यात राहतील, अशी अपेक्षा आहे.
खरेदीत घट
शाळा सुरूझाल्याने ग्राहकांकडून बटाट्याला मागणी आहे. मात्र, यंदा बटाट्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने खरेदीचे प्रमाण घटले असल्याचे दिसून येत आहे.
सचिन चवळे, भाजीपाला विक्रेते
पंधरा दिवस तेजीच
बटाट्याचे दर हे किमान पंधरा दिवस चढेच राहण्याची शक्यता आहे. रामदास कर्डिले, बटाटा विक्रेते