आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

४०० बड्या इमारतींचा वीज, पाणीपुरवठा हाेणार खंडित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महापालिकाक्षेत्रातील बड्या इमारतींचे फायर अाॅडिट करण्यासंदर्भात वारंवार नाेटीस काढूनही जवळपास ४०० इमारतींनी काणाडाेळा केल्याची बाब समाेर अाली अाहे. दरम्यान, जुलैअखेरपर्यंत फायर अाॅडिट सादर करणाऱ्या इमारतींचा वीज पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाणार अाहे.

नाशिक शहरात िदवसेंदिवस हायराईज इमारतींचे प्रमाण वाढत असून, पंधरा मीटरपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींची संख्या वाढली अाहे. त्याप्रमाणे माेठ्या शाळा, माॅल्स, रुग्णालयांची संख्या अधिक असून, या इमारतींना महाराष्ट्र अागप्रतिबंधक जीवसंरक्षक उपाययाेजना अधिनियम २००६ अन्वये अग्निप्रतिबंधक उपाययाेजना करणे सदर उपाययाेजना दुरुस्त कार्यक्षम असल्याचे प्रमाणपत्र अर्थात फायर अाॅडिट रिपाेर्ट वर्षातून दाेनदा जानेवारी जुलैमध्ये सादर करण्याचे बंधन अाहे.

या इमारतींचा समावेश...
शासकीयकार्यालये, हाॅटेल्स, लाॅजेस, रेस्टाॅरंट, रुग्णालये, शैक्षणिक इमारती, बहुमजली शाळा, महाविद्यालये, व्यावसायिक इमारती, सार्वजनिक वापराच्या इमारती, नाट्यगृह, सिनेमागृह, मंगल कार्यालये, अाैद्याेगिक इमारती, गुदामे, १५ मीटरपेक्षा उंच इमारती संमिश्र वापराच्या सर्व इमारती.

कठाेर कारवाई करणार...
अग्निशामकउपाययाेजनांकडे पाठ फिरवणाऱ्यांवर कठाेर कारवाई केली जाणार अाहे. ३१ जुलैपर्यंंत फायर अाॅडिट सादर करणे अनिवार्य असून, त्यानंतर हाेणाऱ्या कारवाईला संबंधित अास्थापना मालक, भाेगवटादार जबाबदार असतील. ४०० बड्या इमारतींनी फायर अाॅडिट अहवाल दिलेला नाही. अनिलमहाजन, मुख्य अग्निशामक अधिकारी