आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कचऱ्यातून वीजनिर्मिती; दरमहा अाठ लाख बचत, नाशिकमधील प्रकल्पाचे लाेकार्पण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- ‘नाशिकमध्ये कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प सुरू झाल्यामुळे दरमहा ९९ हजार युनिट वीजनिर्मिती हाेणार अाहे. यातून महापालिकेची दरमहा किमान अाठ लाख रुपयांची वीज बचत हाेणार अाहे. देशभरात कचऱ्याची समस्या गंभीर स्वरूप धारण करीत असल्यामुळे यापुढे जर्मन सरकारप्रमाणे अन्य प्रगत देशांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील माेठ्या शहरांमध्ये कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्यासारखे प्रकल्प हाती घेतले जातील,’ अशी माहिती जलसंपदा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.   

 
जर्मन सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाच्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण सुधार कार्यक्रमांतर्गत अाणि केंद्र सरकारच्या संयुक्त प्रयत्नातून कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याच्या प्रकल्पाचे बुधवारी (दि. २९) महाजन यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात अाले. या वेळी महाजन यांनी घनकचरा व्यवस्थापनाची समस्या देशभरात चिंतेचा विषय बनल्याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की, यापूर्वी काेणीच या समस्येकडे लक्ष दिले नाही. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी मात्र स्वच्छतेचे महत्त्व लक्षात घेत स्वच्छ भारत अभियान सुरू केले. या अभियानाचाच एक भाग म्हणून कचरा व्यवस्थापनासाठी अनेक शहरांनी पुढाकार घेतला. अाजघडीला माेठ्या शहरांमध्ये कचऱ्यापासून वीजनिर्मितीसारखा प्रकल्प पथदर्शी ठरणार अाहे. या प्रकल्पासाठी अमेरिका, फ्रान्स अशा प्रगत देशांची मदत घेतली जाईल. यामुळे कचऱ्याचे उच्चाटन हाेण्याबराेबरच वीजही उपलब्ध हाेईल. शिवाय, खत व अन्य उत्पादनेही मिळतील. मुख्य म्हणजे, पाण्यावर पुनर्प्रक्रिया करून त्याचा किमान शेतीसाठी वापर करण्याचा प्रयत्न असेल. कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा उपक्रम महाराष्ट्रातील हा पहिला प्रकल्प असून त्याचा भविष्यात विस्तार करणे गरजेचे ठरेल. त्यासाठी लाेकांनी सहकार्य करून अाेला व सुका कचरा स्वतंत्र संकलित करून घंटागाडीत टाकावा,’ असे अावाहनही त्यांनी केले.    

 

हॉटेल्समधील शौचालये महिलांसाठी खुली   
महिलांची शाैचालयावाचून हाेणारी कुचंबणा थांबवण्याचा अाशावाद महापाैर रंजना भानसी यांनी व्यक्त केला. मात्र महापालिकेची अार्थिक परिस्थिती व अन्य बाबींमुळे स्वच्छतागृहांची संख्या वाढवण्यावर बंधन हाेते. तसेच जागा मिळण्याची अडचण हाेती. या पार्श्वभूमीवर नाशिकमधील हाॅटेल्स, रेस्टाॅरंटमधील स्वच्छतागृह महिलांना माेफत उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला हाेता. ‘अाभार’ या हाॅटेल व्यावसायिकांच्या संघटनेने त्यासाठी तयारी दाखवली असून, या सुविधेचे अाैपचारिक अनावरण एका स्टिकरद्वारे करण्यात अाले.

 

 

बातम्या आणखी आहेत...