आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Power Minister Chandrasekhar Bavanakule In Nashik

बावनकुळेंचा अधिका-यांना ‘शॉक’, माहिती दिल्याने गडचिरोलीला बदलीची धमकी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- किती जणांना वीज जाेडण्या दिल्या, कितींचे अर्ज प्रलंबित, घरगुती जाेडण्या किती, कृषीपंपांसाठी किती, फीडरची स्थिती नेमकी काय, कुठे वीजपुरवठ्याच्या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत, कुठे नाहीत, किती कामे चालू, किती बाकी, त्यांची काय अाहे स्थिती, आदिवासी, मागास भागात वीजपुरवठ्यासाठी किती कामे केली, अशा प्रश्नांची सरबत्ती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वीज वितरण आणि महापारेषणच्या अधिकाऱ्यांवर केली. त्यांची त्यामुळे पाचावर धारण बसल्यासारखी अवस्था झाली.
काहीही माहिती मिळत नाही, हे पाहून संतापलेल्या मंत्रिमहाेदयांनी मला हवी ती माहिती द्यावीच लागेल. दिल्यास तासाभरात गडचिरोलीलाच बदली करण्याचा शॉक या अधिकाऱ्यांना दिला.
नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बावनकुळे यांनी वीज कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली. त्यांच्या कामकाजाचे वाभाडे काढले. बैठकीसाठी काेणतीही तयारी करता अालेल्या अधिकाऱ्यांना एकाही प्रश्नाचे उत्तर देता आल्याने थेट त्यांच्या सेवापुस्तकातच याची नोंद घेण्याचे आदेश त्यांनी दिले. शिवाय व्यवस्थापकीय संचालक, प्रकल्प संचालक, संचालक संचलन यांच्या सेवा पुस्तकांमध्येही शेरे मारण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केल्याने अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. तितक्यावर थांबता पूर्वी कामचुकारपणा केल्यामुळे पोलिस विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना गडचिरोली भागात बदलीचा धाक दाखविला जात असे, ही प्रथा ऊर्जाखात्यातही सुरू करण्याचा अवघ्या तासाभरात तसे अादेश िदले जातील, असा इशारा बावनकुळेंनी दिला.

अर्ज केल्यानंतर २१ दिवसांच्या आत कनेक्शन देण्याचे आदेश असताना ते दिले जात नाही. घरगुती कनेक्शनसाठी १०५० रुपयेच शुल्क घ्यावे. जादा अाकारणी करू नये. पायाभूत सुविधांसाठी पैसे घेण्याबाबत अालेल्या तक्रारी खपवून घेतल्या जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. मी १६ तास काम करतोय, अधिकाऱ्यांनीही तसेच काम केले पाहिजे. माझी २५ वर्षांची कामकाज पद्धती तपासून पाहा. या खात्यातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठीच माझी नेमणूक करण्यात अाली अाहे. १५ दिवसांत व्यवस्थापकीय संचालक आणि संचालकांनी बैठकीत कामांचे सुसूत्रीकरण करावे, महिनाभराने परत बैठक घेतली जाईल, त्यात मला सर्वच माहिती उपलब्ध झाली पाहिजे, अशी स्पष्ट ताकीदच त्यांनी दिली.
मंत्रिमहाेदयांनीमला हवी ती माहिती द्यावीच लागेल. दिल्यास तासाभरात गडचिरोलीलाच बदली करण्याचा शॉक या अधिकाऱ्यांना दिला.

सेवापुस्तकांमध्ये करणार नाेंद
कार्यकारीअभियंता, शाखा अभियंता, अधीक्षक अभियंता, लाईनमन यापैकी कोणीच नियमित काम करत नसल्यास त्याचा फटका थेट व्यवस्थापकीय संचालक आणि संचालकांसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बसेल. त्यांच्या सेवा पुस्तकावरच तशा नोंदी करण्याचे आदेश ऊर्जामंत्र्यांनी या वेळी दिले.

मिहानप्रकल्पासाठी तीन महिन्यांची दिली मुदत
मिहानप्रकल्पात घेतलेल्या जागा ज्या प्रयोजनासाठी आहेत, त्यासाठीच वापरता येतील. त्यात बदल करावेसे वाटत असतील, तर त्यासाठीही तीन महिन्यांचा अल्टिमेटम दिला आहे. या कालावधीनंतरच पुढील निर्णय घेण्याचे अादेश मुख्यमंत्र्यांनी िदल्याचे या वेळी सांगण्यात अाले.
सर्वांनावीज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न...
वीजवितरण, निर्मिती आणि महापारेषणच्या केंद्र आणि राज्याच्या योजनांमध्ये अाम्ही मागे आहाेत, पण त्यातील सुधारणांसाठी स्वत: प्रयत्न करत आहे. वीज गळती, निर्मिती, कोळशाची उपलब्धता अशा सर्वच घटकांची पाहणी करून नियोजन केले जात अाहे. राज्यातील प्रत्येक गावात सर्वांना वीज उपलब्ध करून देण्याचे ध्येय अाम्ही ठेवले अाहे. प्रा.चंद्रशेखर बावनकुळे, ऊर्जामंत्री
अधिकाऱ्यांना काढले बैठकीतून बाहे
बैठकीतवीज वितरणच्या िस्थतीबाबत काहीही माहिती नसलेल्या अधिकाऱ्यांनी अात्ताच्या अात्ता बाहेर जाऊन सर्व माहिती घ्यावी, मगच परत यावे, असे सुनावत ऊर्जामंत्र्यांनी सरळ त्यांना बाहेरचाच रस्ता दाखविला.